
25 डिसेंबर 2021 रोजी पापडी वसई परिसरातील नामांकित समाज सेविका मा. श्रीमती शमीम फिरोज खान हिचा वाढदिवस मोठ्या थाटात संपन्न करण्यात आला. वाढ दिवसाच्या निमित्ताने गोर गरीब लोकांना राशन चे वाटप करण्यात आले. तसेच गरीब व गरजू लोकांना इ श्रम कार्ड बनवून मा. एड. किरण म्हात्रे , यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले. वाढदिवस साजरा करण्यासाठी व क्रिसमस ( नाताळ) च्या निमित्ताने मा. जेरी मच्याडो यांनी जिंगलबेल बनवून लहान मुलांना चॉकलेट वाटप केली व मुलानं बरोबर छायाचित्रे काढली. त्यामुळे मुले आनंदाने नाचत होते. सदरच्या कार्यक्रमात मा. शमीम फिरोज खान यांनी सर्व जणांचे आभार मानले या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा.फिरोज खान, मा.आसिफ शेख, मा. शालिनी डिसुझा, मा. जेरी मच्याडो, मा. हार्दिक नाईक, मा. जिगण्यासा नाईक, मा. मुस्कान इंद्रिसी यांनी फार परिश्रम केले आहे, तसेच मा. आहिल आसिफ शेख व फरहीन आसिफ शेख यांनी बर्थडे केक आणून केक कापून मा. शमीम फिरोज खान हिचा वाढदिवस साजरा केला.
