


पालघर दि 29 : – 28 मार्च रोजी रात्री 2:30 च्या सुमारास ब्राह्मणगाव ता. मोखाडा येथील दुकानदार अनंता बाळू मौळे यांच्या घर व दुकास शॉट सर्किट मुळे आग लागली होती. सदर आगीमध्ये चार जणांचा मृत्यू झाला जखमी झालेल्या रुग्णांना नाशिक येथील जिल्हा रुग्णालय मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी नाशिक जिल्हा रुग्णालय मध्ये भेट देऊन जखमीची विचारपूस केली. रात्री लागलेल्या या आगीत चार व्यक्ती मयत झाल्या आहेत. या मध्ये
गंगुबाई बाळू मौळे , द्वारका अनंता मौळे पल्लवी अनंता मौळे ,
, कृष्णा अनंता मौळे – यांचा समावेश आहे.
. नाशिक येथे उपचार घेत असलेले जखमी व्यक्ती .
भावेश अनंता मौळे , अश्विनी अनंता मौळे यांच्या उपचारा विषयीची सविस्तर माहिती पालकमंत्री दादाजी भुसे यांनी घेतली तसेच उपचारात कोणत्याही प्रकारची कमतरता येऊ नये तसेच उपचाराचा दैनंदिन अहवाल द्यावा असे निर्देश पालकमंत्री दादाजी भुसे यांनी नाशिक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रेखाराव खंडे यांना दिल्या यावेळी मोखाडा तहसिलदार वैभव पवार , अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीनिवास , अमित पाटील आदी उपस्थित होते