महापालिकेने बांधलेली सर्वधर्मीय स्मशान भूमी तोडल्याने जनतेच्या सुमारे११ कोटी रुपयांचा चुराडा झाला.ते जनतेचे कररूपी पैसे परत यावेत म्हणून मी वसईकर अभियानाच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने गेली ५० दिवसांपासून सुरू आहेत.पण पालघर पोलीस त्या प्रकरणात साधा एफ आय आर करावयास तयार नाहीत.त्यामुळे पोलिसांना परमेश्वर मानून त्यांची रोज आरती करणे, त्यांची व गणपती बाप्पाची धार्मिक पालखी काढणे, पोलीस स्टेशन समोर ७ तासांचे सलग खडे रहो आंदोलन, रक्त क्रांती अभियानातून मा.मुख्यमंत्री याना रक्त दाना द्वारे भावना पोहचविणे अशी आंदोलने सुरूच आहेत.तरीही पालघरचे एसपी कायदा मानत नाहीत, मा.सर्वोच्य न्यायालयाचे आदेश मानत नाहीत, त्यांचा डिजीचे परिपत्रक मानत नाहींत म्हणून असे संवेदन हीन एसपी आम्हा वसईकर जनतेस नकोत, म्हणून पालघर एसपी चले जावं आंदोलन सुरु करण्यात आले. गावा गावात चोका चौकात जन संवाद सभांचे आयोजन करण्यात येऊन नागरिकांना जागृत करण्यात येत आहे.
या सर्वाचा राग मनात असल्याने दिनांक २७/८/१९रोजी जनतेच्या पोलिसांच्या विषयी असलेल्या काही तक्रारी मांडण्या बाबत आगाऊ वेळ घेऊन जेव्हा काही कार्यकर्ते वसई पोलीस स्टेशला गेले होते तेव्हा त्यांच्यावर तीन ते चार दिवसांनी खोटा
गुन्हा क्र. I 223/२०19, एसपी पालघर यांच्या सांगण्यावरून दाखल करण्यात आला.त्यात
Iआरोपी क्र.१)मिलिंद खानोलकर२)डॉमणिका डाबरे३)अमित म्हात्रे४)फरगोस वकील५)चव्हाण वकील६)किरण शिंदे ७)शम्स पठाण ८)दत्ता जाधव ९)बरथोल फर्नांडिस व त्यांचा मुलगा व अन्य १० ते १५पुरुष व महिला अश्यांची नावे दाखल आहेत.वसईत पथमच असा गुन्हा दाखल होऊननवा इतिहास पालघरच्या एसपी घडविला आहे.हा गुन्हा
कलमे:१४१,१४७,१२०(ब),४४७, ४४८,५०४, ५०६ अन्वये दाखल झालेला आहे.
भ्रष्ट अधिकारी व लोकप्रतिनिधी याना वाचविण्याचा प्रयत्न करणे, मनमानी करून राजकीय कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून अन्याया विरुद्धची आंदोलने दडपण्याचा प्रयत्न करणे.काहीशी जवळीक करून अन्य नागरिकांवर बेकायदेशीर कारवाई करणे, आपल्या कार्यकक्षेतील कर्मचाऱ्यांवर नियंत्र ठेवण्यास असमर्थ असणे,जन सेवक असताना जनता व पोलीस यांच्यात दुवा साधण्या ऐवजी संघर्षाचे वातावरण तयार करणे या पालघर एसपीच्या कार्यपद्धती बाबत वसईकर जनता व संघटनेच्या भावना अतिशय तीव्र आहेत.असा अधिकारी आम्हास नको त्यामुळे पालघर एसपी चले जावं हे आंदोलन जनतेचा सहभाग वाढवून अधिक तीव्र करण्यात येईल व त्यांची बदली होत नाही तोपर्यन्त हे आंदोलन सुरूच राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *