
वाघरालपाडा व सर्वे नं.104 धोवली याचे परिणाम तर नाही ना जिल्हाधिकारी यांचे बदलीचे कारण…
जी.एम बोडके पालघर जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी

पालघर चे जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांची तातडीने बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी जी.एम बोडके यांची पालघरच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी दिनांक 22 जुलै 2022 च्या पाठविलेल्या आदेशात म्हटले आहे.
डॉ.माणिक गुरसळ यांनी पालघर चे जिल्हाधिकारी म्हणून 2 सप्टेंबर 2020 रोजी पदभार स्वीकारला होता. सायंकाळी उशिरा बदलीचे आदेश मिळाल्याचे सांगण्यात आले. गुरसळ यांच्याकडून बोडके यांनी तातडीने पदभार स्वीकारावा अश्या स्वरूपाचे आदेश पारित करण्यात आले आहे.
