पालघर दि.26 :- जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आज रोजी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी दिपप्रज्वलन करुन कार्यकमाची सुरुवात केली त्यांनतर कारगिल शौर्य योद्धास पुष्प अर्पण करुन आदराजंली वाहिली यावेळी निवासी उपजिल्हाधिकरी डॉ किरण महाजन, माजी सैनिक भाऊराव तायडे, सुरेश आवटे, भगवान सोरठी, ठाणे जिल्हा माजी सैनिक हितकरी संस्था पालघर,
संस्थेचे सर्व पदाधिकरी व सैनिक फेडरेशन चे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन केले की जिल्हयातील सर्व माजी व आजी सैनिकाच्या परिवरासाठी लसीकरण करणासाठी एक विशेष शिबीर घेण्यात येणार असून कोणीही त्यापासून वंचित राहणार नाही सर्वाचे लसीकरण पुर्ण करण्यात येईल असे जिल्हाधिकरी श्री. गुरसळ यांनी सांगितले . ठाणे माजी सैनिक हितकरी संस्थाचे अध्यक्ष माजी सैनिक भाऊराव तायडे, यांनी कारगिल विजय दिवसाच्या बाबत आपले मनोगत व्यक्त केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *