

पालघर जिल्हा परिषदेसाठी 361 तर, पंचायत समितीसाठी 653 नामनिर्देशनपत्र वैध…
पालघर – जिल्हा परीषद व पंचायत समिती चे निवडणुकीचे बिगुल वाजले, आघाडी व युती अजून कोणा ही बरोबर झाली नसली तरी, इच्छुकांनी आपले नामांकन भरले. पालघर जिल्हा परीषद व आठ पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाली असून, मंगळवारी झालेल्या
छाननीनंतर वैध ठरलेल्या नामनिर्देशन पत्रांची संख्या पुढीलप्रमाणे : –
जिल्हा परीषद – पालघर- 88 नामनिर्देशनांपैकी 87 वैध, विक्रमगड-78 पैकी 77 वैध, जव्हार-20 पैकी 20 वैध, वाडा-40 पैकी 40 वैध, मोखाडा- 15 पैकी 15 वैध, डहाणू-71 पैकी 70 वैध, तलासरी-30 पैकी 29 वैध तर वसई-23 पैकी 23 नामनिर्देशनपत्र वैध ठरले आहेत.
पंचायत समितीसाठी वैध ठरलेल्या नामनिर्देशन पत्रांची संख्या पुढीलप्रमाणे :-
पालघर-184 पैकी 184, वैध विक्रमगड-91 पैकी 86, जव्हार-43 पैकी 41, वाडा-92 पैकी 91, मोखाडा- 38 पैकी 38, डहाणू-115 पैकी 113, तलासरी-57 पैकी 54 तर वसई मधील-47 पैकी 46 नामनिर्देशनपत्र वैध ठरली आहेत.