प्रतिनिधी

विरार : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या पालघर जिल्हा अध्यक्षपदी वसई तालुक्यातील कॅथरीन फेलिक्स परेरा यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. संघटनेचे सरचिटणीस रामराव वऱ्हाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही अधिकृत घोषणा केली.

सोलापूर येथे 23 फेब्रुवारी रोजी राज्य अध्यक्ष शिवानंद भरले यांच्या अध्यक्षतेखाली आणि संघटनेचे नेते विजय बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे कार्यकारी मंडळ सभा व आजीव सभासद अधिवेशन उत्साहात संपन्न झाले. या अधिवेशनात विविध जिल्ह्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. यामध्ये पालघर जिल्ह्याची धुरा अनुभवी कार्यकर्त्या कॅथरीन परेरा यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

यावेळी राज्य उपाध्यक्ष म्हणून उस्मानाबादचे बिभीषण पाटील, तर सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी धनाजी शिवराम मुळे यांची निवड करण्यात आली. या प्रसंगी राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष गोपाळ आगीवाले, हरिभाऊ निसरड, शंकरराव सावंत, रमेश गायकवाड, सोमनाथ शेटे यांसह राज्यभरातील पदाधिकारी आणि हजारो आजीव सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कॅथरीन परेरा यांच्या निवडीमुळे पालघर जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रश्नांना अधिक ताकद मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या या निवडीबद्दल जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातून आणि शिक्षक संघटनांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *