
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील घेण्यात आलेल्या इ. १२ वी (उच्च माध्यमिक) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सदर परीक्षेस पालघर जिल्ह्यातील २६८२२ मुले व २१२७२ मुली असे एकूण ४८०९४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २४३७३ मुले उत्तीर्ण तर १९७६७ मुली उत्तीर्ण असे एकूण ४४१४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ९०.८६ % मुले व ९२.९२% मुली असा एकूण ९१.७७ टक्के निकाल लागला आहे. सर्व विद्यार्थ्यांचे व मुख्याध्यापकांचे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.पालघर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. पालघर. व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद पालघर यांनी अभिनंदन केले आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना १२ वी च्या परीक्षेत चांगले यश मिळाले आहे.शिक्षण समिती सभापती म्हणून कार्यभार हातात घेतल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांकडे जातीने लक्ष दिल्याने हे यश प्राप्त झाले आहे.१२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या ग्रामीण भागातील तसेच जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो- ज्ञानेश्वर (शिवा)सांबरे, उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य समिती सभापती