◆ धडक कामगार युनियनच्या पाठपुराव्याला यश! प्रशासनाकडून मागण्या मान्य!

डहाणू : धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आज उपवनसंरक्षक डहाणू कार्यालयावर आज “धडक मोर्चा” काढण्यात आला. जितेंद्र कोरहळे (एम. एम. सी. कृषी),
उपविभागीय वन अधिकारी व सहाय्यक वन संरक्षक यांच्या कार्यालयात प्रथम सर्व रेंजच्या अधिकाऱ्यांना बोलवून मागण्या मान्य करून घेण्यात आल्या. ज्यामध्ये कामगारांचे पगार झालेच पाहिजेत या वर ठोस उत्तर हवी अशी भूमिका कामगार नेते अभिजीत राणे यांनी मांडली असता जिल्हाधिकारी कार्यालयाचे डी. पी. ओ. सचिन महागडे यांच्याशी वन विभागाकडून संपर्क करून तात्काळ चर्चा करून अनुदान देण्याचे आश्वासन घेण्यात आले. त्यानंतर डहाणू उप वन संरक्षक मधूमिता मॅडम यांची भेट घेऊन सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली यावेळी कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांचा शाल घालून सत्कार केला.
बैठकी दरम्यान प्रत्येक वन परिक्षेत्र अधिकारी यांच्याकडून कामगारांच्या मागण्या मान्य करून घेण्यात आल्या.
जितेंद्र कोरहळे
(एम. एम. सी. कृषी),

उपविभागीय वन अधिकारी व सहाय्यक वन संरक्षक यांच्यासमोर प्रथम

बोईसर रेंज चे अधिकारी

एन. एल. मोरे यांनी रमेश सुतार याचा 30 तारखेच्या आत पगार दिला जाईल तसेच येणाऱ्या 1 तारखेपासून काढलेल्या 6 कामगारांना कामावर घेतले जाईल असे मान्य केले.

डहाणू रेंज चे अधिकारी उत्तम पाटील यांनी काढलेल्या 2 कामगारांना कामावर घेण्याचे मान्य केले.

उधवा रेंज च्या रुपाली निकट यांनी 11 कामगारांना वेगवेगळ्या पद्धतीचे काम देऊन कामगारांना पुन्हा घेण्याबाबतीत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असे मान्य केले.

सायवन रेंज चे एस. डी. लोहकरे यांच्या रेंजमधील 14 कामगारांच्या पगारात तफावत असून यात खुद्द जितेंद्र कोरहळे यांनी स्वतः व्यक्तिशः लक्ष घालून विषय मार्गी लावण्याचे मान्य केले.

कासा रेंज चे एस एस पाटील यांनी 11 जणांपैकी 2 जणांचे पगार 3 दिवसात दिले जातील व बाकी कामगारांनाही वेगवेगळ्या ठिकाणी काम दिले जाईल असे मान्य केले.

भाताने रेंज चे स्वप्नील साळुंखे यांनी कामगारांना दररोज काम देण्यात येईल असे मान्य करण्यात आले.

दहिसर रेंज च्या नम्रता हिरे यांनी कामगारांना ब्रेक न देता काम दिले जाईल असे मान्य केले.

कामगार नेते अभिजीत राणे यांनी यावेळी वन कर्मचाऱ्यांना संबोधित करताना अधिकाधिक मागण्या वन प्रशासनाने मान्य केल्या असून हा विजय येथे उपस्थित प्रत्येक वन कर्मचारी व त्यांच्या एकजुटीचा आहे आपली एकजूट हीच आपली खरी ताकद आहे. जो पर्यंत आपली एकजुटीची ताकद आहे तो पर्यंत आपला हक्क कोणी आपल्या पासून हिरावून घेऊ शकत नाही असे यावेळी ते म्हणाले.
यावेळी धडक कामगार युनियनचे वन विभागाचे अध्यक्ष जॉनी वायके, युनियनचे जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव, तसेच रमेश धुरी, तांदळकर विल्सन परेरा, बी के पांडे, विशाल मोरे ,नितीन खेतले आदी पदाधिकारी व शेकडो वन कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *