

वाडा, दि.09 जून : महाराष्ट्र पोलीसांना वाढता कोरोनाचा धोका बघता पालघर चे पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पालघर पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार करण्यासाठी विषेश रूग्णालय सुरू केले आहे. वाडा जवळ असलेले आयडियल रूग्णालय येथे हे विषेश पोलीस रूग्णांना कोरोनावर उपचार मिळणार आहेत. 50 खाटांचे (CCC) सुसज्ज डेडीकेटेड कोरोना साठी राखीव असून 50 खाटां या कोविड(DCHC) साठी राखीव ठेवल्या आहेत. पालघर जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वानेरे यांच्या प्रयत्नाने सदर रूग्णालय सुरू झाले आहे.
कोरोना संकटात पोलीस गेली तीन महीने दिवस रात्र आपली कामगीरी बजावत असताना अनेक पोलीसांना कोरोनाची लागण झाली होती. अनेक ठिकाणी पोलीसांना दवाखाण्यात प्रवेश दिले गेले नाही. पालघर जिल्ह्यातील सध्या 24 पोलीसांना कोरोनाची लागण झाली आहे. विरार वसई विभागात काम करणा-या पोलीसांसोबत त्यांच्या कुटुंबीयांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याची माहीती समोर आली होती. सदर रूग्णालय सुरू झाल्याने अनेक पोलीसांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत. पोलीस अधिक्षक यांनी आल्या आल्या आपल्या सहकारी लोकांसाठी रूग्णालय सुरू करून त्यांना एक हक्काचे रूग्णालय सुरू करून आपल्या सहका-यांच्या आरोग्याची केवळ काळजी न करता ठोस उपाययोजना केली. या मुळे पोलीसांना आता निर्भयपणे लढता येईल.
या रूग्णालयात जव्हार येथील डॉ. गुप्ते श्वसन विकार तज्ञ यांच्यासोबत असलेले डॉक्टर तसेच येथील तीन स्टाफ व आरोग्य विभागाचे इतर डॉक्टर अशी तज्ञ व अभ्यासु डॉक्टरांची टीम पोलिसांवर ती उपचार करणार असून 1 व्हेंटीलेटर ची व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध आहे. जर ICU ची गरज पडल्यास किंवा जास्त त्रास असेल तर अशा रुग्णांना टिमा हॉस्पिटल बोईसर किंवा विरार वसई येथील हॉस्पिटल मध्ये ज्या ठिकाणी ICU व्यवस्था आहे, अशा ठिकाणी हलवण्यात येईल अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कांचन वानरे यांनी दिली.
पालघर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे म्हणाल्या की
पोलीस दलातील माझे कर्मचारी covid-19 संकटाशी लढतांना त्यांना ही त्याचा संसर्ग होऊ शकतो तसे झाल्यास त्यांना चांगल्या प्रकारचे उपचार मिळावे. प्रत्येक कर्मचारी मोलाचा आहे, महत्वाचा आहे. त्याला सर्व सोई सुविधा मिळवून देण्यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. पालघर पोलीस उत्तम काम करत आहेत त्यांच्यासाठी विषेश रूग्णालय सुरू झाल्याचा आनंद आहे.