
प्रतिनिधी :
पालघर जिल्ह्यातील ११८ अनधिकृत शाळांवर कारवाईचे आदेश देण्यात आले असून प्रत्यक्षात कधीपर्यंत व कशी कारवाई होते आणि होते की नाही, हे येणारा काळच ठरवेल.
या बाबतची अधिक माहिती अशी की, पालघर जिल्ह्यातील ११८ अनधिकृत शाळांची यादी पालघर जिल्हा परिषद विभागातर्फे जाहीर करण्यात आली आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १८ मधील पोट कलम ५ व शासन राजपत्र दि. ३/१२/२०१२ रोजीच्या अधिसूचनेनुसार जी कोणतीही व्यक्ती मान्यता प्रमाणपत्र मिळविल्याखेरीज एखादी शाळा स्थापन करील किंवा चालवील किंवा मान्यता काढून घेतल्यानंतर ही शाळा चालूच ठेवतील, ती, एक लाख रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडास आणि ज्या कालावधीत असे उल्लंघन करण्याचे चालू ठेवले असेल त्या कालावधीतील प्रत्येक दिवसाखेरीज १०, ०००/- रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडास पात्र असेल.
पालघर जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी अनधिकृत शाळांवर कारवाईबाबतचा आदेश जारी केला असून सदर प्रकरणी प्रत्यक्षात काय कारवाई होते, कारवाई होते की नाही ते लवकरच कळेल.
दर वर्षी अनधिकृत शाळांवर कारवाईचे आदेश दिले जातात. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई होत नाही. २०१८ मध्ये २०४ अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली होती. २०१९ मध्ये १९० शाळांची यादी जाहीर झाली. २०२२ मध्ये ११८ अनधिकृत शाळांची यादी. इतर शाळांवर कारवाई झाली की त्या शाळांनी मान्यता घेतली? याची माहिती लवकरच प्राप्त करून घेऊ.