
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सुकाणू समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी दिली मंजुरी
नवनिर्मित पालघर जिल्ह्याची 2014 मध्ये निर्मिती झाली आणि अल्प कालावधीतच आपल्या पालघर जिल्ह्यात जनतेच्या हिताच्या दृष्टीकोनातून सर्वसुविधायुक्त अश्या प्रशासकीय संकुलाचे काम झपाट्याने सुरू झाले. आणि आज सदर जागेवर प्रशासकीय इमारती मोठ्या दिमाख्याने उभ्या असून , पालघर जिल्ह्याच्या इतिहासात , वैभवात व सौंदर्यात भर पडणारे आहे. परंतु सदर नवनिर्मित जिल्हा प्रशासकीय इमारती संकुलात बहुजन समाजाचे कैवारी , भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दैदिप्यमान कार्यास उजाला देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनास अत्यंत तुटपुंज जागा दिल्याने बहुजन समाजात असंतोष निर्माण होऊन त्याचे रूपांतर आक्रोशात झाले होते. परिणामी दलित पँथर संघटनेने विविध प्रश्न आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन संदर्भात दोन वेळा मोर्चाचे आयोजन करून तसेच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तीन बैठकीत डॉ बाबासाहेब आंबेडकर भवनाचा विषय अग्रस्थानी धरून आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संबंधित विभागास डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बाबत प्रस्तावना पाठवण्यात आली होती.व त्याचा पाठपुरावा संघटनेच्या वतीने वेळोवेळी करण्यात येत होता. दिनांक 18 नोव्हेंबर 2021 रोजी पालकमंत्र्यांचा अध्यक्षतेखाली झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत डॉ बाबासाहेबआंबेडकर भवन, क्रांतिसूर्य बिरसा मुंडा आदिवासी भवन , महिला भवन ,महिला स्वतंत्र रुग्णालय , बांधण्यासाठी प्रत्येकी पाच एकर जागा मंजूर करण्यात आली त्याच प्रमाणे सागरी संशोधन आणि परीक्षण समितीला दहा एकर जागा , डाक विभागास अर्धा एकर जागा व सध्या जिल्हा न्यायालयास मंजूर जागे व्यतिरिक्त जिल्हा न्यायालयास पाच एकर जागा मंजूर करण्यात आल्याने समस्त बहुजन समाजात आनंदाचे वातावरण असून, डॉ बाबासाहेब आंबेडकर भवनास मंजूर जागेत भव्य दिव्य असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन निर्माणासाठी व त्यासाठी लागणाऱ्या निधी बाबत शीघ्र कारवाई करण्यात येऊन जलदगतीने भवनाचे कार्य पूर्ण करण्याबाबतचे तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर भवनासाठी पाच एकर जागा मंजूर केल्याबाबतचे कृतज्ञतापूर्वक आभारपत्र मा.जिल्हाधिकारी साहेब पालघर व उपजिल्हाधिकारी जाधवर साहेब यांना देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अविश राऊत ,पालघर जिल्हाध्यक्ष जगदीश राऊत , पालघर जिल्हा उपाध्यक्ष रोहित चौधरी , पालघर जिल्हा युवा अध्यक्ष ऍड. अजिंक्य म्हस्के ,पालघर तालुका अध्यक्ष किशोर राऊत , पालघर जिल्हा उपाध्यक्षा आशा गवई , पालघर तालुका महिला उपकार्याध्यक्षा शालिनी वानखेडे ,चंदादेवी ठाकूर ,दिनकर वानखेडे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.