


पालघर दि 24 – पालघर जिल्ह्यात हवेतून ऑक्सीजन निर्मितीसाठी जव्हार, पालघर व डहाणू येथील आरोग्य सुविधा प्रत्येकी सव्वा टन (१२५ Jumbo Cylinder प्रतिदिन) ऑक्सीजनची लवकरच निर्मिती होणार आहे. मा.पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानुसार रक्कम रु. ०३ कोटी २० लाखाच्या प्रशासकीय मंजूऱ्या जिल्हा विकास योजनेतून देण्यात आल्या असून त्यापैकी पालघर व जव्हार चे कार्यारंभ आदेश देण्यात आले असून सदरचे प्रकल्प लवकरच पूर्ण होतील.ठिकाण- उपजिल्हा रुग्णालय, जव्हार व डहाणुग्रामीण रुग्णालय पालघर वरील सर्व ठिकाणी कोविड रुग्णालय स्थापन करण्यात येत आहे. असे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी कळविले आहे.