
भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन भारतरत्न स्व. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती पालघर जिल्हा परिषदेच्या कार्यालयात साजरी करण्यात आली.
कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने कलाम यांचा जन्म दिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
भारताचे ११ वे राष्ट्रपती आणि भारताला अधिक शक्तिशाली करणारे महान वैज्ञानिक म्हणून डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची ख्याती जगभरात आहेच परंतु लहान मुलांना आणि युवकांना योग्य दिशा देण्याचे काम आज हि त्यांनी केलेल्या लेखनाच्या माध्यमातून होत आहे.
जि. प. कार्यालयात कलाम यांच्या जयंतीनिमित्त मा. उप मुख्य कार्यकारी अधिकारी, (साप्रवि) संघरत्ना खिल्लारे,यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला प्रसंगी अधिकारी व कर्मचारी यांनी कलाम यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मानवंदना अर्पण केली.