दिनांक १७/०९/२०२१ रोजी माननीय प्रथम वर्ग दिवाणी न्यायाधीश पालघर श्री विक्रांत खंदारे साहेबांच्या अध्यक्षतेखाली पालघर तालुका विधी सेवा समितीच्या वतीने “न्याय आपल्या दारी” तसेच विविध कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सदर शिबिरामध्ये माहिम,वडराई,हरणवाडी गावातील महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.
पालघर विधी समितीचे संजय दळवी,तेजल ठाकूर, पालघर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष सुरेश महाडिक, वकिल राहुल ठाकरे यांनी विविध कायदेविषयक प्रश्नांबाबत मार्गदर्शन केले.
घरगुती हिंसाचार,समान काम समान मोबदला (स्त्री -पुरुष समानता), कामाच्या ठिकाणी होणारे महिलांचे शोषण व त्या अनुषंगाने अस्तित्वात असलेले कायदे आदींबाबत उपस्थित महिलांना अवगत करण्यात आले.
माहिम गावचे सरपंच श्री दिपक करबट यांनी तंटामुक्ती गाव समिती बाबत माहिती दिली.
तदनंतर माननीय न्यायाधिश महोदयांनी शिबीराचा उद्देश तसेच पुढील काळात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कायदेविषयक उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली.
न्याय तुमच्या दारी,फिरते न्यायालय, आपापसात तडजोड, लोकन्यायालय संकल्पना, शासनाच्या विविध योजना तसेच पालघर न्यायालयातर्फे दि. २ आॅक्टोंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत “आजादिका अमृत महोत्सव” उपक्रम राबविण्यात येणार आहे त्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन करण्यात आले. पाडण्यास हातभार लावावा.
सदर शिबिरामध्ये पालघर बार असोसिएशनचे सदस्य,माहिम ग्रामपंचायतीचे सदस्य व कर्मचारी वृंद, ग्रामसेवक उंदरे साहेब,पालघर कोर्टाचे वकिल,सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाचे विधी स्वंयसेवक आदी मंडळी उपस्थित होती.
अॅड संजय दळवी यांनी उपस्थितांचे तसेच ग्रामपंचायत माहिम यांचे आभार मानून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *