
दिनांक २३ ऑक्टोबर २०२१ रोजी पंचायत समिती पालघर शिक्षण विभाग , तंबाखू नियंत्रण उपक्रम कार्यक्रम, सलाम मुंबई फाउंडेशन व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याच्यावतीने तसेच नांदगाव तर्फे मनोर केंद्राच्या केंद्रप्रमुख श्री. सुरेश ढवळे सर यांच्या प्रेरणेने केंद्रांची तंबाखूमुक्त कार्यशाळा जिल्हा परिषद केंद्रशाळा नांदगाव तर्फे मनोर, तालुका पालघर येथे आयोजित करण्यात आली. यावेळी नांदगाव तर्फे मनोर केंद्राच्या केंद्रप्रमुख श्री. सुरेश ढवळे सर यांनी सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक करुन मार्गदर्शन केले .तर पालघर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरेपाडा चे मुख्याध्यापका श्रीमती स्वाती राजन तिवाटणे यांनी तंबाखू
मुक्त शाळा करण्यासाठी आवश्यक ९ निकष विविध उदाहरणे देत , प्रत्यक्ष फोटो दाखवून स्पष्ट केले व उपस्थितांना मार्गदर्शन केले . Tobacco Free School Application ( टोबॅको फ्री स्कुल ॲप) याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी केंद्रप्रमुखांसह केंद्रातील १५ प्रमुखशिक्षक उपस्थित होते.
शेवटी सर्वांना तंबाखुमुक्तची शपथ देण्यात आली व सदर कार्यशाळेची सांगता करण्यात आली अशी माहिती सलाम मुंबई फाउंडेशन चे प्रतिनिधी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा समन्वयक श्री मिलिंद रूपचंद पाटील यांनी सांगितली