कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी प्रशासनाला धारेवर धरणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.श्री.संदिपजी देशपांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्र नवनिर्माण वसई विरार शहर महापालिका व मीरा भाईंदर महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष तसेच पालघर जिल्हासंघटक मा.श्री.विजयजी मांडवकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र नवनिर्माण पालघर नगरपरिषद कामगार कर्मचारी सेनेचे स्थापना करण्यात आली. मा.राजसाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन तसेच कामगारांसाठी वेळोवेळी व न्याय मिळवून देणारी संघटना म्हणून पालघर नगरपरिषद मधील ठेका अंतर्गत कार्यरत असणारे कंत्राटी कर्मचारी यांनी श्रमजीवी संघटनेला राम राम करत महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे मोठ्या दिलाने सभासदत्व स्वीकारले. ठेकेदार मार्फत कामगारांवर दिवसेंदिवस होणारे अन्याय व त्यांना त्यांच्या अधिकार तसेच हक्कांपासून वंचित ठेवून महापालिका प्रशासन व ठेकेदार कामगारांच्या टाळू वरचे लोणी खाण्याचा प्रयत्न वर्षानुवर्षे करत होते पण यापुढे एकही कामगार आपल्या न्याय हक्क व अधिकारापासून वंचित राहणार नाही तसेच कामगारांना कोणत्याही प्रकारचा इतरांनी देण्याचा प्रयत्न केला तर त्याला मनसे स्टाईल ने उत्तर देण्यात येईल असा इशारा अध्यक्ष विजयजी मांडवकर यांनी दिला. कामगारांच्या व्यथा व समस्या जाणून घेत कामगारांना कमी पगारात राबवून घेत असल्याचे निर्दशनास आले परंतु आपल्या वेतनाचा पुरावा म्हणून वेतन पावती, पी.एफ, ई.एस.आय.सी तसेच इतर कोणत्याही सुविधा देत नसल्याची व लोकप्रतिनिधी यांच्याकडून त्यांच्या सोयीनुसार काम न केल्यास कामावरून काढून टाकण्याची धमकी देत असल्याची तक्रार कामगारांनी दिली. अशा विविध कठीण परिस्थिला सामोरे जाऊन दबावतंत्राचा वापर करून कामगारांची पिळवणूक करत असल्याचे स्पष्ट झाले. महापालिका कंत्राटी कामगार यांच्यासाठी मनसेच्या कामगार संघटनेने केलेल्या कार्याची व कामाची माहिती मा.अध्यक्ष विजयजी मांडवकर यांनी उपस्थित शेकडो महापालिका कंत्राटी कामगार यांना दिली. त्याचप्रमाणे पालघर नगरपरिषद मधील कंत्राटी कामगारांनी मा.अध्यक्ष विजयजी मांडवकर यांचे शॉल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी संघटनेचे सरचिटणीस चंद्रशेखर गुंजारी, चिटणीस रोहन नेरूरकर, कोषाध्यक्ष प्रथमेश सावंत तसेच प्रभाग समिती चिटणीस निलेश खवणेकर, सुहास मोडकले, रोनित नेरूरकर, अक्षय कल्याणकर, मनोहर घरटकर, अमित श्रोती व सहचिटणीस अमोल जोगळे त्याचप्रमाणे कामगार प्रतिनिधी सदानंद वैती, मदन गायकवाड, तांडेल व इतर प्रतिनिधी, पदाधिकारी, शेकडो कामगार उपस्थित होते.
जि.अध्यक्ष मांडवकर साहेब: यांच्या मार्गदर्शनातून पालघर नगरपरिषद मनसे कामगार सेनेची नोंदणी झाली :-प्रसिध्दी प्रमुख (मिडीया)पालघर जिल्हा-नजीर मुलाणी आणी चिटणीस कामगारांणा न्याय मिळु लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *