

◆ आपल्याच राज्यातील नागरिकांना मारण्यासाठी काट्यांना तेल लावा असे चॅनलवर येऊन सांगणारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल पालघर जिल्ह्यात दोन साधूंवर व त्यांच्या ड्रायव्हर झालेल्या हत्याकांडच्या घटनास्थळी म्हणजे गडचिंचले या गावास भेट दिली व आढावा घेतला… यावेळी शिवसेनेचे खासदार, आमदार आदी अनेक मंडळी उपस्थित होती.
◆ आढावा घेतल्यानंतर लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी पालघर जिल्ह्याचे एसपी यांना सक्तीच्या रजेवर पाठवत आहोत अशी घोषणा केला.
◆ माननीय गृहमंत्र्यांनी नक्की काय आढावा घेतला… हा मला पडलेला प्रश्न आहे. कारण मी या विषयात अनेक ज्येष्ठ वरीष्ठ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांशी बोललो…. आणि तेही या गृहमंत्र्यांच्या आढाव्या पूर्वी…!
◆ तेव्हा प्रत्येकाने मला हेच सांगितले की, याघटने बाबतीत पालघर एसपी गौरव सिंग यांचे अभिनंदन करावे तेवढे कमी आहे.
◆ कारण घटने दिवशी जेव्हा ही गोष्ट त्यांना समझली तेव्हा तात्काळ ते पालघरवरून घटनास्थळी पोहोचले… व प्रथम जे 100 आरोपी पकडले गेले त्यात अर्ध्याअधिक आरोपी हे त्यांनी स्वतः रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात आरोपींचा पाठलाग करून डोंगर चढून उतरून जंगलात एक-एक आरोपीला पकडले आहेत.
◆ व जेव्हा याच राज्य सरकार वर अनेक आरोप होऊ लागले तेव्हा याच प्रथम 100 आरोपींमुळे राज्य सरकारची अब्रू वाचली आहे… व हा विषय शांत करण्यासाठी स्वतः गृहमंत्र्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर या आरोपींची यादी जाहीर केली आहे.
◆ असे असताना पालघर एसपी यांचे अभिनंदन नका करू पण अशी सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांचे मनोबल खच्चीकरण तरी नको करायला हवे होते. पालघर एसपी म्हणून त्यांनी जे करायला हवे होते ती प्रत्येक गोष्ट कायद्याला धरून त्यांनी केली आहे. तात्काळ कासा पोलीस कर्मचाऱ्यांवर केलेली कारवाई… बाकी आरोपींचा ड्रोन ने शोध सुरू आहे.. हे सर्व सुरू असताना यातुन गृहमंत्री महोदयांनी काय साध्य केले हे त्यांनाच ठाऊक?-
© *-कुणाल जाधव*
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)