

वसई: बहुजन महापार्टी चे संस्थापक महासचिव शमशुद्दीन खान यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना पाठवलेल्या सक्तीच्या रजेवर फेरविचार करावा व त्यांना सन्मानपूर्वक त्यांच्या पदी नियुक्त करावे अशी मागणी केली आहे.
मागील महिन्यात पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर असल्याच्या संशयातून दोन साधू आणि त्यांच्या चालकाची जमावाने हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. परंतु याप्रकरणाला काही समाजकंटकांकडून जातीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. व राज्य सरकारने तो यशस्वी रित्या हाणून पाडला. त्याबद्दल राज्य सरकारचे मी अभिनंदन करतो. दरम्यान काळात याविषयाला जातीय रंग देऊन जे राजकारण करण्यात आले त्याचा बहुजन महापार्टी जाहीर निषेध करते. व संपूर्ण जग, देश व राज्य सरकार कोरोना विरुद्ध लढत असताना काही पक्ष याघटनेला राजकीय रंग देण्यात व्यस्त होते हे पाहून माणूस म्हणून दुःख झाले होते. असे ते म्हणाले.
परंतु आज जी कारवाई गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून करण्यात आले आहे. यामुळे कोरोना महामारीच्या काळात पालघर पोलिसांचे मनोबल खच्चीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे माझी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व गृहमंत्री यांना विनंती वजा निवेदन आहे की, आपण पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सन्मानपूर्वक पुन्हा आपल्या पदावर नियुक्त करावे. अशी मागणी शमशुद्दीन खान यांनी केली आहे.