कामे होण्यास ताण तणाव निर्माण होत आहे. तर इतर कर्मचारी वर्गावर ही जबाबदारी सोपवली असल्याने त्यांच्यावरही कामाचा अतिरिक्त भार व तणाव दिसून येत आहे.

तहसीलदार कार्यालयांमध्ये सर्वाधिक पदे तलाठी संवर्गाची रिक्त आहेत.तब्बल ८७ पदे रिक्त आहेत.तर महसूल सहायक या पदाची ७९ पदे रिक्त आहेत. लिपिक-टंकलेखक यांची पदेही रिक्त असल्याचे दिसून येते. त्यामुळे तहसीलदार कार्यालयांमध्ये कामांना विलंब होत आहे. परिणामी नागरिकांची कामे होण्यास उशीर झाल्यामुळे नागरिकांचा रोष अधिकारी कर्मचारी वर्गाला ओढावून घ्यावा लागत आहे. उपविभागीय कार्यालयातही कर्मचार्‍यांच्या बाबतीत अशीच काहीशी स्थिती आहे. तेथेही कर्मचाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त आहेत. त्यामुळे महसूल विभागाच्या कामाचा खेळखंडोबा होत असून जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसत चालली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, तहसीलदार कार्यालय व मंडळ अधिकारी कार्यालय अशा महसूल विभागाच्या विविध कार्यालयांमध्ये आता कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर दोन ते तीन पदांचा अतिरिक्त पदभार दिल्यामुळे या कामांचा डोंगर त्यांच्यावर वाढतच जात आहे. त्यामुळे कामाची एक ना धड भाराभर चिंध्या अशी परिस्थिती होत असल्याचे अधिकारी कर्मचारी सांगत आहेत. काही अधिकारी कर्मचारी अशा अतिरिक्त कामामुळे मानसिक तणावाखाली असल्याचे कर्मचारी सांगत आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालय
गट – मंजूर पदे – भरलेली पदे – रिक्त पदे
अ – ३० – २६ – ४
ब – ५१ – २५ – २६
क – २० – ४- १६
ड – १०४ – ७३ – ३१
एकूण – ७३५ – ४८२ – २५३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *