
प्रतिनिधी : पालघर – तारापूर येथील राहणारे गायक राहुल नाईक हे प्रत्येकाच्या मनात घर करून राहिले आहेत. आपल्या मधुर आवाजात प्रत्येकाला गाण्याच्या माध्यमातून वेड लावणारा हा कलाकार खूप कमी वयात सर्वांच्या मनात अधिराज्य गाजवत आहे. अनिश गायकवाड, राहुल माळी यांच्या S S creation या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून १६ फेब्रुवारी २०१८ रोजी ए मामा तुला उशीर केव झाला या गाण्यातून सर्वप्रथम झळकला. आणि या गाण्यातून प्रकाशझोतात आला. त्या नंतर अस करिन मी तस करिन, लाडका धनी माझा निवट्याना गेला, संगीता तुझी मोटार गाडी, वाकड्या माडावरून, गुलाबचे आया गावामध्ये फुगेवाला आलाय, मला क्याला ग पियदोडा नवरा यांसारख्या गाण्यातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. कवी गीतकार अजिंक्य म्हस्के यांच्या शब्दांना योग्य न्याय देत आपल्या भूमिकेशी नेहमी एकनिष्ठ राहिलेला हा कलाकार आज स्थानिकांसाठी सेलिब्रिटी ठरला आहे. कित्येक वर्षे खितपत पडलेली गावठी गाणी पुन्हा एकदा या कलाकारांच्या माध्यमातून जिवंत झाली आहेत. आणखी नवनवीन गाणी गात राहुल नाईक हे सर्वांसाठी लोकप्रिय ठरले आहेत. तसेच प्रेक्षकांच्या नेहमी संपर्कात असणारा हा कलाकार आपला स्थानिक असून हळदी शो, लग्न शो, आदी कोणताही कार्यक्रमात आपल्याला स्टेज वर नेहमी पाहवयास मिळतो. आपल्याला आवाजातून व कलेतून खूप सारी मेहनत करून संघर्ष करत हा कलाकार आपल्या समोर आला आहे. आता पर्यंतचा लोकगीतातील लोकप्रिय कलाकार म्हणून प्रेक्षकांची जास्त पसंती दर्शविलेला हा कलाकार आहे.
