
‘त्या’सहा. आयुक्ताच्या व्हायरल व्हिडीओची चौकशी करण्याची मागणी
गंगाथरण डी. ठरणार वसई विरारचे सचिन वाझे?
विरार(प्रतिनिधी)-वसई विरार महापालिका प्रशासनावर सध्या पूर्णपणे राज्य शासनाचे नियंत्रण आहे. अशा स्थितीत अतिरिक्त आयुक्त आशीष पाटील महापालिका क्षेत्रात उघडपणे बेकायदा बांधकामांना अभय देऊन वसई-विरार महापालिका क्षेत्र विद्रुप करीत आहेत.एका जागरूक नागरिकाने केलेल्या पालिकेतील एका सहा.आयुक्तांच्या स्ट्रिंग ऑपरेशन मध्ये ही बाब समोर आली आहे.या स्ट्रिंग ऑपरेशन मधून अतिरिक्त आयुक्त आशीष पाटील हे नियमबाह्यपणे सहाय्यक आयुक्त, उपायुक्त यांच्यावर दबाव टाकून बेकायदा बांधकामांना अभय द्यायला भाग पाडत असल्याचे निष्पन्न होत आहे.या
‘स्ट्रिंग ऑपरेशन’ च्या व्हायरल व्हिडीओची चौकशी करणे गरजेचे होते. परंतु स्ट्रिंग ऑपरेशन’ मध्ये अतिरिक्त आयुक्त आशीष पाटील यांच्या भ्रष्ट्राचाराबाबत केलेला खळबळजनक गौप्यस्फोट इतका जिव्हारी लागले की सहा आयुक्त मोहन संखे यांची २४ तासात चक्क दोन वेळा बदली केली गेली.यावरून पालिका आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर अनेक सवाल उपस्थित होत आहेत. सदर प्रकरणात
अतिरिक्त आयुक्त आशीष पाटील
व अवैध निर्मात्या वर कायदेशीर कारवाई करण्यात टाळाटाळ होत असल्याचे निष्पन्न होत आहे.त्यामुळे ज्या प्रकारे निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझेला ज्याप्रमाणे १०० कोटी गोळा करण्याचे लक्ष्य महविकास आघाडी सरकारने दिले होते त्याच धर्तीवर वसई विरार मनपाला सुध्दा १०० कोटीचे लक्ष्य आहे काय? याचा मनपा प्रशासनाने जाहीर खुलासा करावा असे भाजपा वसई विरार जिल्हा उपाध्यक्ष मनोज बारोट यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.तसेच ‘त्या’सहा. आयुक्ताच्या व्हायरल व्हिडीओची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
वसई विरार पालिकेच्या पेल्हार प्रभागातील तत्कालीन सहा. आयुक्त मोहन संखे यांच्या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मनपा क्षेत्रात सुरू असलेल्या अवैध बांधकामाला मनपाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून संरक्षण दिलं जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
प्रभाग समिती (फ) मध्ये होत असलेलं सर्व अवैध बांधकामे मनपाचे अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील यांच्या आशीर्वादानेच होत असल्याचे संखे यांनी स्पष्ट म्हटले आहे.
अशा अवैध बांधकाम धारकांकडून वसुलीचे काम ठेका अभियंता स्वरूप खानोलकर व युवराज पाटील करत असल्याचा गौप्यस्फोटही संखे यांनी या व्हिडीओत केला आहे.शिवाय
तोडक कारवाई करण्यास गेल्यास पाटील यांचे कारवाई थांबण्याचे आदेश येतात.
असे सांगतएवढेच नव्हे तर संखे यांनी अवैध बांधकाम धारकांची नावे देखील उघड केली आहेत.ज्या व्यक्तीला मनपा व्दारे एका संविधानिक पदावर सहा आयुक्त म्हणून नेमणूक केली आहे आणि अस जबाबदार अधिकारी अशा प्रकारे आरोप करते म्हणजे ही खूप गंभीर बाब असून पालिका प्रशासनासाठी लज्जास्पद आहे. अशा घटनांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे त्यापेक्षा ही मोठा गुन्हा आहे.सदर व्हायरल व्हिडीओ प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी भाजपा वसई विरार जिल्हा उपाध्यक्ष मनोज बारोट यांनी केली आहे.
अतिरिक्त आयुक्तपदाच्या अधिकारपदाचा आशीष पाटील यांच्याकडून प्रचंड प्रमाणात गैरवापर होत आहे.सद्यस्थितीत आशीष पाटील यांच्या गैरकार्यपद्धतीमुळे बेकायदा बांधकामांना अभय देऊन त्यांच्याकडून लाच घेण्याच्या भूमिकेमुळे वसईचे भरून न येणारे नुकसान होत आहे. वसई-विरार महापालिका प्रशासनातील उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, अतिक्रमण विभागप्रमुख यांना बेकायदा बांधकामांच्या विरोधात आशीष पाटील कारवाई करू देत नाहीत, अशी सत्य परिस्थिती आहे. तर बांधकाम माफिया थेट आशीष पाटील यांच्याशी संगनमत करून सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्त यांना झिडकारून उघडपणे दिवस-रात्र बेकायदा बांधकामे करीत आहेत.
एकूण परिस्थितीत वसई-विरार महापालिका प्रशासनाची नाच्चकी आशीष पाटील यांच्या लाचखोर कार्यपद्धतीमुळे होत आहे. आशीष पाटील यांच्या काळात निर्माण झालेली बेकायदा बांधकामे, महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारची मलिन झालेली प्रतिमा याचा गंभीरपणे विचार करून अतिरिक्त आयुक्त आशीष पाटील यांच्याविरोधात राज्य सरकारने निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.शिवाय दुसरीकडे संखे यांनी ज्या अवैध विकासकांच्या नाव दिले आहेत त्यांचा अनधिकृत बांधकामांवर आज पर्यंत मनपाने कोणतीही ठोस कारवाई केलेली दिसून येत नाही.त्यामुळे मोहन संखे यांच्या व्हिडीओ
फित मध्ये त्यांनी दिलेल्या सर्व सर्व अवैध बांधकामावर त्वरित तोडक कारवाई करण्यात यावी व त्या सर्व बांधकाम माफियांवर एम.आर.टी.पी. अंतर्गत तसेच जनतेसह पालिका प्रशासनाची फसवणूक केल्याने फौजदारी गुन्हे दाखल करण्यात करण्याची मागणीही बरोट यांनी केली आहे.