
कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून पालिका आयुक्तांची खुलेआम दिशाभूल
बांधकाम माफियांच्या इशाऱ्यावर पालिका अधिकाऱ्यांकडून कारवाई
विरार(प्रतिनिधी )-वसई विरार पालिकक्षेत्रात दिवसेंदिवस वाढत असलेल्या गुन्हेगारी प्रऊत्तीच्या बांधकाम माफियांच्या मुजोरीला चाप लावण्यासाठी पालिका प्रशासनाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा ‘बुलडोझर पॅटर्न’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.योगी आदित्यनाथ यांनीही गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी असाच ‘बुलडोझर पॅटर्न’ राबवत आहेत.महाराष्ट्र वृत्तपत्र संघटना,क्राईम न्यूज वेल्फेअर असोसिएशन व वसई विरार शहर महानगर पत्रकार संघ या पत्रकार संघटनांसोबतच्या दिनांक १७ जुलै रोजच्या बैठकीनंतर पालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांनीही हा ‘बुलडोझर पॅटर्न’ राबविण्याचा निर्णय घेतला होता.वसई विरार मधील पत्रकारांवर बांधकाम माफ़ीयांकडून वाढलेले हल्ले,पालिका अधिकाऱ्यांकडून नागरिकांना भेटण्यासाठी होत असलेली टाळाटाळ,नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये पत्रकार कक्ष उपलब्ध करून देणे तसेच इतर विविध विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.विशेष करून पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत या बैठकीत चिंता व्यक्त करत ठोस उपाययोजना करण्याची मागणी लावून धरण्यात आली होती.
दरम्यान या ‘बुलडोझर पॅटर्न’ ची दि १९ जुलै पासून अंमलबजावणीही सुरू झाली आहे.परंतु पालिका प्रशासनाच्या या ‘बुलडोझर पॅटर्न’वर बांधकाम माफियांचीच दहशत दिसून येवू लागली आहे.पालिकेच्या पथकातील कनिष्ठ अधिकारी हे कारवाई दरम्यान बांधकाम माफियांच्या दहशतीखाली वावरताना दिसत होते. तसेच बांधकाम माफिया अर्शद चौधरी व त्याच्या टोळीतील सहकाऱ्यांच्या इशाऱ्यावर पालिकेचे पथक कारवाईचे सोपस्कार पार पाडत होते.त्यामुळे कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून पालिका आयुक्तांची खुलेआम दिशाभूल होत असल्याचे चित्र पहावयास मिळाले.दरम्यान पालिकेच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या एकंदरीत भूमिकेबद्दल पत्रकारांनी नाराजी व्यक्त करत खुद्द आयुक्तांनी या मोहिमेत सहभागी होण्याची मागणी केली आहे.
दि १९ जुलै रोजीच्या कारवाईमुळे महापालिका प्रशासनाच्या कार्यशैलीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.पोलीस फोज फाटा आणि संरक्षक कर्मचारी यांची भलीमोठी फोज सोबत असून सुद्धा पुरेशी कारवाई करण्यात पालिका प्रशासन सफशेल फेल ठरले आहे. दिवसभरात कारवाई च्या नावावर फक्त पाच हजार चौरस फूट अनधिकृत बांधकामावर तोडण्यात आले.प्रभाग समिती एफ मध्ये दिवसाला सरासरी पन्नास हजार चौरस फूट अनधिकृत बांधकाम माफ़ीयां कडून उभे राहतात.त्यामानाने फक्त महापालिका संयुक्त कारवाई च्या नावावर हत्तीच्या नावाखाली मुंगी ची शिकार केली असल्याचे बोलले जात आहे.तसेच पालिकेची व्यवस्था आणि मनुष्यबळ आज दिवसभरात वाया घालवण्याचे काम पालिका अधिकाऱ्यांनी घडवून आणले आहे.नावापुरती संयुक्त कारवाई तसेच मोठा गाजावाजा करत आयुक्तांनी संयुक्त मोहीम राबविण्यावण्याचे आदेश प्रस्थापित केले पण त्यांच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या आदेशावर पाणी फेरले.सूत्रांच्या माहिती नुसार पुढील चार दिवस तोडक कारवाई मोहीम चालू असणार आहे.आजमितीला एकट्या पेल्हार प्रभागात तब्बल नऊ लाख चौरस फूट अनधिकृत बांधकाम उभे राहिले आहे.त्यापैकी पैकी फक्त पाच हजार चौरस फूट अनधिकृत बांधकाम निष्काशीत झाले आहे.आणि यातील बहुतांश अनधिकृत बांधकामे ही बांधकाम माफ़ीयां अर्शद चौधरी तसेच त्याच्या टोळीची आहेत.आणि या टोळीकडून स्वतःची अनधिकृत बांधकामे वाचवण्यासाठी
पालिकेच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना विविध आमिषे दाखवून आपल्या मर्जीनुसार कारवाई करवून घेत आहेत.त्यामुळे बांधकाम माफियांची बिमोड करण्यासाठी निघालेला बुलडोझर भलतीकडेच भरकटताना दिसत आहे.
नुकतेच वसई विरार मधील एका पत्रकाराचे पेल्हार परिसरात दिवसाढवळ्या अपहरणकरून जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. येथील गुन्हेगारी प्रऊत्तीचा बांधकाम माफिया अर्शद चौधरी द्वारा हे कृत्य करण्यात आले होते.त्यामुळे येथील पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात गृहमंत्र्यांच्या आदेशाने गुन्हे दाखल झाले खरे.परंतु गुन्हा दाखल झालेला बांधकाम माफिया अर्शद चौधरी हा जामिनावर असून त्याच्याकडून आणखीन काही पत्रकारांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या मिळत आहेत.विशेष म्हणजे पालिका क्षेत्रात विविध ठिकाणी बांधकाम ठेकेदारीच्या माध्यमातून अर्शद चौधरी या बांधकाम माफ़ीयाने काळी माया जमा केली आहे.तसेच मुंबई अहमदाबाद महामार्ग परिसरात आणखी काही छोटे मोठे बांधकाम ठेकेदार हाताशी धरून जागोजागी अनधिकृत बांधकामे उभी केली आहेत.शिवाय अर्शद चौधरी विरोधात अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हेही दाखल आहेत.दरम्यान या गुन्हेगारी प्रऊत्तीच्या बांधकाम माफियासह त्याच्या टोळीचा बिमोड करण्यासाठी तसेच इतर काही मागण्यांसाठी तीन पत्रकार संघटनांनी दिनांक १७ जुलै २०२४ रोजी आयुक्त अनिल कुमार पवार यांची भेट घेतली.या भेटीत पत्रकारांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत बांधकाम माफिया अर्शद चौधरी तसेच त्याच्या टोळीची अनधिकृत बांधकामे निष्काशीत करण्याची लावून धरली.यावेळी आयुक्तांनीही पत्रकारांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना निष्काशन कारवाईचे आदेश जारी करत या कारवाईचा खर्च याच बांधकाम माफियांकडून वसूल करण्याचे निर्देशही दिले होते.