
◆ शिधावाटप दुकानांमध्ये धान्याच्या काळाबाजारीला येणार ऊत
◆ शिधापत्रिका धारकांचे हाताचे ठसे न घेता होणार धान्य वाटप

शिधापत्रिका धारकांना धान्य देताना त्यांच्या हाताचे ठसे न घेता धान्य वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे समजते. त्यामुळे आता शिधावाटप दुकानांमध्ये धान्याच्या काळाबाजारीला ऊत येणार हे नक्की. पूर्वी प्रमाणे अंदाधुंद भ्रष्टाचार चालणार.
याबाबतची अधिक माहिती अशी की, शिधा वाटप दुकानांमध्ये धान्याची काळाबाजारी होत असल्याच्या असंख्य तक्रारी शासनाकडे गेल्यानंतर शासनाने शिधापत्रिका धारकांचे हाताचे ठसे देऊन धान्य वाटप करण्याबाबत परिपत्रक काढून तसे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यामुळे धान्याच्या काळाबाजारीला लगाम लागला होता. मात्र त्यातही काही प्रमाणात काळाबाजारी होतच होती. शिधापत्रिका धारकांना त्यांच्या हिश्याचे धान्य मिळत नव्हते.
आता पूर्वी प्रमाणेच शिधापत्रिका धारकांच्या हाताचे ठसे न घेता धान्य वाटप करण्याबाबत शासनाने आदेश काढला असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. शासनाने सदरचा आदेश का काढला हे संबंधित विभागाचे मंत्री व सचिव यांनाच माहीत. मात्र शासनाच्या सदर निर्णयामुळे धान्याची काळाबाजारी बेफामपणे होणार आहे, हे नक्की.
वसई पुरवठा कार्यालयातील अधिकारी यांनी तात्काळ निवडक दुकानदारांना त्यांच्या मोबाईलवर संदेश पाठवतात की, वाढीव धान्य घेऊन जा….वसई पुरवठा कार्यालयातील कर्मचारी यांची शिधा वाटप दुकानदारांशी सेटिंग असून त्या दुकानदारांकडून त्यांना दरमहा हप्ता मिळतो. या गैरव्यवहारात तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांचा हात निश्चितच असेल, यात अजिबात शंका घेण्याचे कारण नाही. त्यामुळे अश्या प्रकरणाला आळा घालण्यासाठी जनतेने जागरूक राहणे गरजेचे आहे त्यासाठी https://rcms.mahafood.gov.in/Portal/DistrictDetails.aspx या वेबसाईटवर जाऊन आपले आपल्या रेशन कार्ड चे (आर.सी ) नंबर टाकून बघावे आपल्या धान्य किती भेटत आहे अन्यथा आपल्या धान्याची काळाबाजारी होत तर नाही ना म्हणून आपण जागरूक राहण्याची गरज आहे