उपसंपादक स्नेहा जावळे वृत्त काव्य

” पुरात भाजली स्वत:ची पोळी “

न दिवसभर बातम्यात चंद्रकांत पाटीलजी
गिरिष महाजनांची पाठराखण
करताना दिसले.
आम्ही कशी मदत करतोय याची स्वस्तुती
करत चंद्रकांत पाटील मात्र
स्वत: सुरक्षीत बसले.
पुरग्रस्तांची हालत पाहुन सामान्य माणुस
पुढे येवुन मदतीला पहा
कसा सरसावले.
बाकी नेते मंत्री स्वत:ची पोळी भाजण्यात
स्वार्थाची शाल पांघरुण
पक्ष विस्तारात गुंगले.
माणुसकीला काळीमा लावणारा जी. आर
मुख्यमंत्र्यांनी जाहीर करुन
जणु उपकार केले.
दोन दिवस पुरात अडकलात तर मोफत दहा
किलो गहु-तांदुळ मुख्यमंत्र्यानी
जाहीर आज केले.
पुरात अडकले म्हणुन अन्य-धान्य मिळेल
हा एकच नियम सरकारनी
का नाही मान्य केले.
ज्याची कुंटुंब , घर जनावरे शेती गेली त्यांना
१० किलो गहु-तांदुळ दोन दिवस
पुरात तर मिळणार.
प्रशासनाने विचार करावा माणुसकी सोडुण
तुम्ही सेल्फी घेत लोकांच्या भावनांशी खेळणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *