
वसई(प्रज्योत मोरे) – वसई पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 25/06/21 रोजी रात्री 9:00 वाजता चे सुमारास फिर्यादी हिमांशू हरेंद्रसिंग पनौरा वय 28 वर्षे व्यवसाय रेस्टॉरंट मालक रा. रूम न 111ते 114 पहिला मजला, पाम इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंगच्या बाजूला वसई डेपो ता-वसई जि. पालघर यांनी समक्ष पोलीस ठाणेस येवून त्यांच्या द पोस्ट ऑफिस या रेस्टॉरंट मध्ये एक मुलगा वय अंदाजे 21 वर्षे व त्याच्यासोबत एक मुलगी वय 21 वर्षे व त्याच्यासोबत एक मुलगी वय 21 वर्षे असे दोघेजण दिनांक 23 जून 2021 रोजी दुपारी 2 ते 4 या वेळेत आले. त्यांनी हॉटेलमध्ये ड्रिंक व जेवण केले व त्याचे एकूण बिल 6416/-रुपये हे पेटीएमच्या माध्यमातून भरतो असे सांगून सदर मुलाने त्याच्या मोबाईलवर पेटीएम या बनावट अँपवर बिल भरल्याचा बनावट मेसेज फिर्यादी याना दाखविला व पेटीएम पेमेंट आल्याचे मेल येण्यापूर्वी सदर आरोपी हे पसार झाले. हॉटेल मालकाला पेमेंट द्वारे कोणतेही पेमेंट आले नसल्याने त्याची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तरी सदर फिर्यादी याना वसई तसेच नालासोपारा परिसरातील इतर हॉटेल मालकांना याबाबत विचारणा केली असता अशाच प्रकारे फसवणूक वसई रिपब्लिक हॉटेल,व द फार्म हॉटेल नालासोपारा येथे सदर इसमानी केले असल्याचे फिर्यादी यांना समजले सदरबाबत फिर्यादी हे पोलीस ठाणेस तक्रार देण्यासाठी आले असता त्यांचा सविस्तर जबाब नोंद वसई ठाणे गु.र.क्र.252/21 कलम 420,34 भादवि अन्वये नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हाचे गांभीर्य लक्षात घेऊन व मा.पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ-2) श्री.संजयकुमार पाटील साहेब यांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शन प्रमाणे स.पो.नि.पवार व त्यांचे अधिनस्त स्टाफ यांनी पुढील तपास सुरू केला.तपासामध्ये तांत्रिक माहिती प्राप्त करून व त्याचे कौशल्यपूर्ण विश्लेषण करून सदर दोन्ही आरोपीत 1) करीना जगदीश सोलंकी 21 वर्षे रा.अल्कापुरी नालासोपारा
2) आदर्श प्रशांत राय वय 21 वर्षे रा.संख्येश्वर नालासोपारा याना ताब्यात घेऊन नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.सदरचा गुन्हा हा तीन ते चार तासात उघडकीस आणला आहे.
तपासा दरम्यान सदर दोन्ही आरोपीतानी अशाप्रकारे नालासोपारा येथे देखील हॉटेलमध्ये फसवणूक केलेबाबत निष्पन्न झाले आहे. सदर प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाणे येथे गु.र.क्र.292/29 कलम 420,34 भादवि अन्वये गुन्हा नोंद आहे.तसेच वसई पोलीस ठाणे हद्रीदत देखील हॉटेल वसई रिपब्लिक हॉटेल फार्म हाऊस नालासोपारा येथे देखील सदर आरोपितांनी अश्याप्रकारे फसवणूक केली असल्याचे निष्पान झाले आहे.तसेच वसई विरार नालासोपारा परिसरात सदर आरोपींतानी अश्याप्रकारे इतर हॉटेल व रेस्टॉरंट तसेच पेट्रोल पंप पब देखील अश्याप्रकारे फसवणूक करून गुन्हा केला असल्याची दाट शक्यता आहे.
वरील कामगिरी मा.पोलीस उप-आयुक्त(परिमंडळ-2)श्री संजय कुमार पाटील व सहा पोलीस आयुक्त श्री.प्रदीप गिरीधर वसई विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.कल्याणराव कर्पे सहा.पोलीस निरीक्षक सुनील पवार स.फौ.भगीरथ पो.ना.1356 विक्रम पन्हाळकर. म.पो.शि./512 कोकरे. पो.शि./722 अमोल बडे यांनी केलेली आहे.