
सज्जाद खान,अर्षद चौधरी, मौनुद्दीन खान,हमीद शेख,समशेर पठाण या पाच बांधकाम माफियांपुढे अंथरले ‘रेड कार्पेट’
३ वर्षात लाखो स्केवर फुटांचे अनधिकृत बांधकाम, पण साधा एम.आर.टी.पी चा गुन्हा दाखल नाही
कनिष्ठ अभियंता किशोर पोवार,अतिक्रमण अधिकारी प्रमोद गोयल बांधकाम माफियांच्या दावणीला
विरार(प्रतिनिधी)- वसई विरार महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न तसा काही नवा नाही.विशेष म्हणजे आजपर्यंत एकाही आयुक्तांनी हा अनधिकृत बांधकामाचा प्रश्न गंभीरपणे हाताळला नाही. आयुक्त पदाची धुरा हाती घेतल्यावर सुरवातीला जोशामध्ये अनधिकृत बांधकामांविरोधात मोहिमा राबविण्या जातात. परंतु त्यानंतर मात्र हा जोश म्हणावा तसा कायम राहत नाही.शिवाय अनधिकृत बांधकामाबाबत आयुक्तांकडे तक्रार घेऊन घेल्यावर ते अतिरिक्त आयुक्त अथवा उपयुक्त यांच्याकडे जाण्याचा सल्ला देतात.अशाच्या प्रकारची कार्यप्रणाली गेल्या १२ वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे साहजिकच कनिष्ठ दर्जाचे अधिकारी स्वतः च आयुक्त असल्याच्या अविर्भावात वागतात. त्यामुळे तक्रार दाराला दाद कुणाकडे मागायची हाच प्रश्न पडतो.अश्याच प्रकारची कार्यप्रणाली आताही सुरू आहे. विद्यमान आयुक्तांनी पदभार स्वीकारल्या पासून पालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या.परंतु सर्वच उपाययोजना पालिकेतील निष्क्रिय व भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे सपशेल फेल ठरल्या आहेत. वास्तविक त्यामुळे बांधकाम माफियांना बळ मिळण्यास मदत झाली.याचा प्रत्यय सध्या पालिकेच्या पेल्हार प्रभागात येत आहे.या प्रभागात बांधकाम माफियांना ‘व्ही.आय.पी’ ट्रीटमेंट मिळत असल्याची चर्चा आहे.या प्रभागात सज्जाद खान,अर्षद चौधरी, मौनुद्दीन खान,हमीद शेख,समशेर पठाण या पाच बांधकाम माफियांचा सर्वाधिक बोलबाला आहे. या बांधकाम माफियांनी आपल्या दहशत व पैश्याच्या बळावर पालिका अधिकाऱ्यांच विकत घेतले आहे.शिवाय या बांधकाम माफियांचे राजकिय नेत्यांशी मधुर संबंध असल्याने स्वतःची नोकरी वाचवण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी चक्क ‘रेड कार्पेट’ अंथरले असल्याचे विदारक पेल्हार प्रभागात पहावयास मिळत आहे.
पालिकेच्या नऊ प्रभागांपैकी असलेला पेल्हार प्रभाग पालिका अधिकाऱ्यांसाठी खास आहे. तसेच नेहमी चर्चेत असलेला प्रभाग म्हणून या प्रभागाची ओळख आहे. या प्रभागात निष्ठेने व प्रमाणिक पणे काम करणे म्हणजे एकप्रकारे गुन्हा ठरतो.त्यामुळे याठिकाणी येणारे सर्वच अधिकारी निष्ठेने व प्रमाणिकपणे काम न करता आर्थिक गणिते ठरवून कामकाज करतात. त्यामुळे साहजिकच आर्थिक तडजोडीच्या कामकाजात पालिका मुख्यालयात बसलेल्या वरीष्ठ अधिकाऱ्यांचीही साथ लाभत. आणि विशेष म्हणजे प्रभाग कार्यालयात बसून मुख्यालयातील वरीष्ठ अधिकाऱ्यांचा प्रति चौरस फुटाचा दर ठरवला जातो.अश्या प्रकारे नियोजनबद्ध कामकाज चालत असल्याने पेल्हार प्रभाग कार्यालयात बांधकाम माफियांची नेहमी रेलचेल असते.सज्जाद खान,अर्षद चौधरी, मौनुद्दीन खान,हमीद शेख,समशेर पठाण हे पाच बांधकाम माफीये पेल्हार प्रभागात एकप्रकारे विशेष अतिथी म्हणून वावरत असतात.या बांधकाम माफियांना पेल्हार प्रभागात मनाचे स्थान असून पत्रकार मंडळींना ताटकळत ठेवून त्यांना प्रथम प्राधान्य देऊन चर्चेसाठी कार्यालयात आमंत्रित केले जाते.एकप्रकारे एखाद्या उद्योगपतीं सारखे स्वागत या बांधकाम माफियांचे पेल्हार प्रभागात करण्यात येते.या पाचही बांधकाम माफियांनी पेल्हार प्रभागाच्या कार्यक्षेत्रात ३ वर्षात लाखो स्केवर फुटांचे अनधिकृत बांधकाम केले आहे. परंतु पण साधा एम.आर.टी.पी चा गुन्हा दाखल नाही.त्यामुळे या बांधकाम माफियांना पालिका अधिकारी नेमके कोणत्या चर्चेसाठी आमंत्रित करतात हे अध्यापही पालिकेने अधिकृत रित्या जाहीर केलेले नाही.परिणामी सामान्य नागरिकांना कायद्याचा धाक दाखवणारे महापालिचे कनिष्ठ अभियंता किशोर पोवार,अतिक्रमण अधिकारी प्रमोद गोयल बांधकाम माफियांच्या दावणीला असल्याचे आदोरेखित होते.