
अतिक्रमण अधिकारी व कनिष्ठ अभियंत्याच्या लाचारीमुळे पालिका आयुक्तांची होतेय नाहक बदनामी

नालासोपारा(निलेश नेमण)-वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी पालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहेत. परंतु पालिकेतील काही अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या भ्रष्ट कारभारामुळे या उपाययोजना शपशेल फेल झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पालिकेच्या पेल्हार प्रभागात सुरू असलेला भ्रष्टाचारी कारभार. या प्रभागात एकप्रकारे भ्रष्टाचाराची गंगाच अवतरल्या प्रचिती नागरिकांना येऊ लागली आहे. याठिकाणी स्थानिक ग्रामस्थांना घर बांधण्यासाठी कायद्याचा धाक दाखवणारे पालिका अधिकाऱ्यांनी धनदांडग्या बांधकाम माफियांपुढे रेड कार्पेट अंथरूण अनधिकृत बांधकाम करण्यास मोकळीक दिली आहे.या धनदांडग्या बांधकाम माफियांकडून ठराविक रक्कम पेल्हार प्रभागातील अतिक्रमण अधिकारी व कनिष्ठ अभियत्याच्या मार्फत पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोचवले जात असल्याची चर्चा सुरु आहे.त्यामुळे वास्तविक बांधकाम माफियांकडून होणाऱ्या आर्थिक सौदेबाजीचे धागेदोरे थेट पालिका मुख्यालया पर्यंत पोहचल्याचे स्पष्ट होत आहे
त्यामुळे या धनदांडग्या बांधकाम माफियांची अनधिकृत बांधकाम वाचविण्यासाठी प्रभागातील स्थानिक ग्रामस्थांच्या घरांवर बुलडोझर चालवून अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई सुरू असल्याचे चित्र निर्माण करत पालिका आयुक्तांची दिशाभूल करत आहेत.
पेल्हार प्रभागात अतिक्रमण अधिकारी म्हणून प्रमोद गोयल तर कनिष्ठ अभियंता पदावर किशोर पोवार यांना नियुक्त करण्यात आले आहेत.परंतु दोन्ही अधिकारी प्रभागातील अनधिकृत बांधकामे रोखण्याऐवजी बांधकाम माफियांशी आर्थिक हितसंबंध जोपासण्यात धान्यता मानत आहे. परिणामी बांधकाम माफियांपुढे लाचारी पत्करून पालिका आयुक्तांच्या धेय्य धोरणांना मुठमाती देत आहेत.एकप्रकारे अतिक्रमण अधिकारी व कनिष्ठ अभियंत्याच्या लाचारीमुळे पालिका आयुक्तांची नाहक बदनामी होत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे पालिका आयुक्तांनी पेल्हार प्रभागातील अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारी कारभाराकडे वेळीच लक्ष देणे क्रमप्राप्त झाले आहे. पेल्हार प्रभागात केलेल्या सर्वेक्षणात
मौजे पेल्हार सर्व्हे नं ५९,६०( दुधवाला कंपाउंड) ,मौजे पेल्हार सर्वे नं २७२(अनधिकृत बांधकाम नियंत्रण चौकी समोर),
मौजे पेल्हार सर्व्हे नं २७२ (सालवा धाब्यामागे हमीद नामक बांधकाम माफियांचे अनधिकृत बांधकाम),मौजे पेल्हार डॅम रोड (अक्रम व शानू नामक बांधकाम माफियाचे अनधिकृत बांधकाम), महापालिका विभागीय कार्यालय रोड वरील झुन नुरीन या इमारतीसमोर सुरू असलेले अनधिकृत बांधकाम,मौजे बिलालपाडा खैरपाडा( प्रमोद इंगळे व महादेव या बांधकाम माफियांचे सुरू असलेले अनधिकृत बांधकाम),मौजे बिलालपाडा सर्वे नं ६६ ही नं ५ (आदर्श इंड इस्टेट),मौजे गोखीवरे सर्व्हे नं १७२ ही नं ७,८ (सीताराम नगर,शर्मा वाडी, संतोष भुवन या ठिकाणी सनी सुरेश सिंह या बांधकाम माफियाचे सूरू असलेले अनधिकृत बांधकाम),तसेच मौजे पेल्हार सर्वे १०६( समशेर नामक बांधकाम माफिया द्वारा औद्योगिक स्वरूपाचे अनधिकृत बांधकाम) आदी ठिकाणी बिनदिक्कत पणे अनधिकृत बांधकामे उभी राहत असतानाही पेल्हार प्रभागाचे कनिष्ठ अभियंता किशोर पवार तसेच अतिक्रमण अधिकारी प्रमोद गोयल हे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करताना दिसत आहेत.या दोन्ही अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे पालिकेचा महसूल बुडत आहेतच शिवाय आयुक्तांचीही प्रतिमा मलिन होत आहे. विशेष म्हणजे पालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाचा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयात चांगलाच गाजत आहे.असे असतानाही पेल्हार प्रभागात कनिष्ठ अभियंता किशोर पवार व अतिक्रमण अधिकारी प्रमोद गोयल यांच्या लालची वृत्ती मुळे अनधिकृत बांधकामांचा आलेख दिवसेंदिवस वाढताना दिसतं आहे.त्यामुळे आयुक्तांनी या दोन्ही अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करुन त्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होऊ लागली आहे.