

दिनांक ३० ऑगस्ट, २०२२ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती ‘एफ’ पेल्हार मधील दूधवाला कंपाऊंड येथे उप-आयुक्त श्री.अजित मुठे यांचे निर्देशानुसार दोन इमारतींच्या अनधिकृत ४ थ्या व ५ व्या मजल्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग समिती ‘एफ’ येथील दूधवाला कंपाऊंड येथील दोन इमारतीत मा.न्यायालयाचे स्थगिती आदेश असतानाही बांधकाम सुरु होते. याबाबत माहिती मिळाल्यावर महानगरपालिका उप-आयुक्त श्री.अजित मुठे यांनी सदर ठिकाणी भेट दिल्यानंतर अनुक्रमे चौथा व पाचवा मजला अनधिकृतरित्या बांधण्यात आल्याचे निदर्शनास आले. याबाबत मा.आयुक्त व मा.अतिरिक्त आयुक्त यांच्या निर्देशानुसार उप-आयुक्त श्री.अजित मुठे यांनी प्रभाग समिती ‘एफ’ चे प्र.सहा.आयुक्त श्री.शशिकांत पाटील यांना तात्काळ तोडक कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार प्र.सहा.आयुक्त यांनी कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने सदर इमारतीतील अनधिकृत मजल्यांवर निष्कासनाची कारवाई सुरु करण्यात आली. सदर कारवाईच्या वेळी उप-आयुक्त श्री.अजित मुठे, प्र.सहा.आयुक्त श्री.शशिकांत पाटील, अभियंता किशोर पोवार, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान व अतिक्रमण विभागाचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.