
वसई तालुक्यातील गाव मौजे पेल्हार व वसई फाटा येथील सरकारी जमिनीवर तरुणांसाठी खेळण्यास मैदान तसेच वृंद्धांसाठी विरंगुळा केंद्र बांधण्यात यावे अशी मागणी भाजपा युवा मोर्चा वसई पूर्व सरचिटणीस आश्विन सावरकर यांनी जिल्हाधिकारी यांना आपले सरकार ह्या पोर्टल द्वारे केली आहे.
वसई तालुक्यातील गाव मौजे पेल्हार ह्या गावातील तरुणांसाठी खेळण्यासाठी मोठे मैदाने नसल्याने आजची तरुण पिढी मोबाईल मध्ये अडकलेली आहे.ह्या मोबाईल मुळे अनेक तरुणपिढी आपले सांस्कृतिक खेळ विसरत चाललेली आहे.ह्या मोबाईल मुळे अनेक तरुण पिढीला आपले जीव ही गमवावा लागला आहे.
तसेच वृध्द लोकांसाठी कोणतीही करमणूक साठी जागा नाही .
ह्या मुळे अनेक वृध्द लोक घरत बसून असतात.
वसई तालुक्यातील गाव मौजे पेल्हार ह्या गावात मोठ्या सरकारी जमिनी आहेत.त्या जमिनीवर तरुणपिढी साठी खेळण्यासाठी मोठे मैदाने तसेच वृद्धांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यात यावे.अशी मागणी भाजपा युवा मोर्चा वसई पूर्व सरचिटणीस आश्विन सावरकर यांनी जिल्हाधिकारी यांना आपले सरकार ह्या पोर्टल द्वारे केली आहे.