डोंगर नाही राहीला, आम्ही नाही पाहिला….

वसई, प्रतिनिधी
वसई तालुक्यातील पोमण गावात सर्वे क्र. १४/३ व १४/४ या जागेत सुमारे साडेचार एकर जागेवर पसरलेला डोंगर होता. स्थानिक भूमाफियांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता मागील वर्षभरात हा पूर्ण डोंगर पोखरून टाकला असून आजच्या घडीला हा डोंगरच येथून गायब झालेला आहे. या डोंगरातून सुमारे ५० हजार ब्रासहून जास्त मातीचे उत्खनन झाले असून ही माती विकून करोडो रुपये कमवून भूमाफियांनी व शासकीय अधिकाºयांनी वर्षभर दिवाळी साजरी केली. हा डोंगर वाचावा म्हणून सामाजिक कार्यकर्ते मनोहर गुप्ता मागील वर्षभरापासून लढा देत असून सरकारी अधिकाºयांच्या निर्ल्लज्जपणामुळे त्यांच्या या प्रामाणिक लढ्याला अद्याप यश मिळालेले नाही.
याबाबत सविस्तर माहिती देताना मनोहर गुप्ता यांनी सांगितले की, पोमणच्या तलाठी अक्षता गायकर व इतर सरकारी अधिकारी हे भूमाफियांचे रक्षक बनले असून सरकारने दिलेला पगार पुरत नसावा म्हणून भूमाफियांकडून मिळणाºया बिदागीवरच त्यांची जास्त मदार आहे. तुटपुंज्या पगारावर काम करणाºया तलाठ्यांच्या संपत्तीची सरकारने फक्त चौकशी लावली तरी अर्धेअधिक तलाठी घरी बसतील. या प्रकरणात तलाठी अक्षता गायकर यांनी भूमाफियांवर अवघ्या ११५ ब्रास मातीचे अनधिकृतरित्या उत्खनन केल्याचा अहवाल तयार केला असून प्रत्यक्षात या ठिकाणी ५० हजार ब्रासहून जास्त मातीचे उत्खनन करण्यात आले आहे. येथील तहसील व महसूल विभागातील कर्मचारी हे भ्रष्टाचाराच्या चिखलात माखलेले आहेत. १२ आगस्ट २०२१ पासून मी हा डोंगर वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सरकारचा करोडो रुपयांचा महसूल बुडत असल्याचे निदर्शनासही आणले तसेच डोंगर सपाटीकरणाचे काम त्वरीत थांबवून संबंधितांकडून दंड वसूल करून त्वरीत गुन्हा दाखल करावा अन्यथा जमीन शासनजमा करावी, अशी मागणीदेखील केली होती. परंतु भ्रष्टाचारी सरकारी अधिकाºयांना सरकारची तिजोरी भरायची नसून आपले खिसे गरम करायचे आहेत. वरपासून खालपर्यंत सर्वच यात सामील आहे म्हणूनच डोंगर गायब झाला… आम्ही नाही पाहिला, अशी भूमिका या अधिकाºयांनी घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *