वसई (प्रतिनिधी)- पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील पोमण ग्राम पंचायत हद्दीत झालेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी गेलेले महसूल विभागाचे पथक कारवाई न करता परत आले. कारवाई का झाली नाही? कितीची सेटिंग झाली ? असे अनेक प्रश्न उदभवत आहे सदर बाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.
याबाबतची अधिक माहिती अशी की, पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील पोमण ग्राम पंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झालेली असून सदर बांधकामांविरुद्ध असंख्य तक्रारी शासनाकडे गेल्यानंतर सदर बांधकामांवर कारवाई करण्याचा मुहूर्त ठरला. आज दि. २६ नोव्हेंबर २०२१ रोजी महसूल विभागाचे पथक पोमण सर्वे नंबर १८०/१, १८१, १८३, १८४, १८९ येथे झालेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पोहोचले. या पथकात नायब तहसीलदार प्रदीप मुकणे, तहसीलदार कार्यालयातील काही कर्मचारी, वसईचे मंडळ अधिकारी शशिकांत पडवळे, मांडवीचे मंडळ अधिकारी सुशांत ठाकरे, कामण तलाठी गणेश पाटील, ससूनवघर तलाठी विलास धर्मा करे पाटील यांच्यासह १० ते १२ पोलीस कर्मचारी सहभागी होते. पोलीस बंदोबस्त अपुरा असल्याचे कारण देत कोणतीच कारवाई न करता महसूल पथक माघारी परतले. भूमाफियांकडून काही आर्थिक लाभ घेतल्याशिवाय पथक माघारी परतलेले नाही असे वाटत आहे. मोठी सेटिंग झाली? सदर बाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी व्हावी. सदर भूखंडावर उमर चौधरी, उमा शंकर गुप्ता, मुन्ना यादव, पद्मजी गजरा आदि भूमाफियांनी अनधिकृत बांधकामे केलेली आहेत. सदर भूमाफियांवर महसूल प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही. तसेच आमच्या प्रतिनिधी यांनी पालघर उपजिल्हाधिकारी मा.किरण महाजन व वसई प्रांताधिकारी /उपविभागीय अधिकारी वसई मा.स्वप्नील तांगडे यांच्याशी संपर्क साधला असता या दोघांचे एकच कारण सांगितले पोलीस मनुष्यबळ कमी आहे पोलिसांनी मनुष्यबळ दिले तर आम्ही कारवाई करू? त्यांच्या अशा उत्तराने संशय येत आहे. तसेच आमच्या सूत्रांनुसार स्थानिक लोकांमध्ये अशी चर्चा आहे की संबंधित भूमाफियाना कोर्टातून स्टे घेण्यासाठी प्रशासन कारवाई करण्यास टाळत आहे !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *