प्रतिनिधी : पालघर जिल्हा वसई तालुका अंतर्गत कामण तलाठी हद्दीत पोमण येथे महसूल प्रशासनाने अनधिकृत बांधकामांवर थातूर मातुर कारवाई केली. मुळात अनधिकृत बांधकामे होत असताना कारवाई केली जात नाही. लाच खाऊन अधिकारी अनधिकृत बांधकामांना संरक्षण देतात. पोमण ग्राम पंचायत हद्दीतील गाव मौजे पोमण सर्वे नंबर १८० हिस्सा नंबर १, १८१, १८२ व इतर परिसरात लाखो फुट अनधिकृत बांधकामे झाली असून महसूल प्रशासनाने सर्वे नंबर १८१ वरील अनधिकृत बांधकामे निष्कासित केली. सर्वे नंबर १८० हिस्सा नंबर १ येथील उमर चौधरी याच्या अनधिकृत बांधकामांना हात ही लावलेला नाही. उमर चौधरी याने फार मोठी सेटिंग लावलेली दिसते ? महसूल प्रशासनाने कारवाई करताना सरसकट करायला हवी. ठराविक बांधकामांवर कारवाई केली जाते यावरून सदरच्या कारवाईत ही भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध होते !
सदर कारवाईबाबत चौकशी झाल्यास भ्रष्टाचार उघड होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *