
पोलिसांन विरूद्ध तात्काळ कारवाई करून त्या पोलिसांना कायम स्वरूपी निलंबित करा. अन्यंथा लाल बावटा जेल भरो आंदोलन करणार
अत्यंत गरिबी, शेती सोडलं तर कामधंदा नाही ,परिस्थितीमुळे “जगावयास चाललो “असे म्हणत घरदार सोडून हजारो किलोमीटर दूर कामा साठी आलेल्या आदिवासी महिला श्रीम.बेबी वावरे, श्रीम.दीपिका वावारे , श्रीम. विमला पुंजारा, श्रीमती सोनंम भोईर, श्रीम. सीता भोईर, श्रीम. तारू डोकफोडे मूळ गाव कावडास कसा,ह्या दिनाक १९ नोव्हेंबर रोजी काही काम मिळाले नाही म्हणून खरेदी साठी पापडी तालुका वसई जिल्हा पालघर येथे शुक्रवार च्या आठवडा बाजारात गेल्या होत्या. त्या चोरी करतात म्हणून संशय घेऊन त्यांना पकडले आणि पापडीच्या पोलीस चौकीत पुरुष पोलिसांनी त्यांना मारहाण केल्याची अत्यंत लांचानास्पद दुर्देवी घटना घडल्याचे समजते.
ज्या महाराष्ट्राला आदरणीय शिवाजी महाराजांची परंपरा आहे, शुर विर लढवय्या म्हणून झाशीची राणी लक्ष्मीबाई ,आहील्या होळकर यांच्या सारख्यांचा इतिहास आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि तदनंतर महाराष्ट्राच्या जडणघडणीत आदरणीय सावित्रीबाई फुले यांच्या सारख्याअनेक थोर विचारवंत स्त्रियांचे योगदान आहे त्या महाराष्ट्रात गोर गरीब आदिवासी स्त्रियांना मारहाण करताना पोलीस कर्मचाऱ्यांची बुध्दी ,मन, हृदय,माणुसकी कर्तव्य काहीच जिवंत नव्हतं का?हा मनाला खंत निर्माण करणारा गंभीर प्रश्न आहे.
स्थानिक प्रशासन म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त यांचे नियंत्रण वजा वचक व मार्गदर्शन याची उणीव याला प्रकाराला जबाबदार आहे अशी चर्चा वसईत आहे.
दुर्दैवाची बाब अशी की,प्रकार घडल्यावर काही दलाल/ हस्तक या प्रकरणात समझोता होऊन आपला आर्थिक लाभ होतो का? या साठी वसई पोलीस स्टे. मध्ये कार्यरत असल्याचे समजते .
आदिवासी जिल्हा असलेल्या पालघर जिल्ह्यात बहुसंख्य मा.आमदार आदिवासी आहेत, ज्या जिल्ह्याचे मा. खासदार हे स्वतः आदिवासी आहेत त्या जिल्ह्यातील वसई तालुक्यात आदिवासी महिलांवर झालेल्या या मारहाणीचा लाल बावट्याच्या वतीने जाहीर निषेध नोंदवला असून.प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधित पोलिस अधिकारी वाघ. ह्यांना कार्यरत असलेल्या पदावरुन निलंबित करण्यात यावे. व कठोर शासन व्हावे अशी मागणी लाल बावट्याच्या वतीने वसई पोलिस स्टेशन वरिष्ठ पोलिस निरीक्षक कर्पे ह्यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. हत्या दरम्यान काॅम्रेड अरूणा मुकणे,काॅम्रेड शेरू वाघ, मथुरा भोईर, राहुल मेढा इत्यादी उपस्थित होते.