


दिनांक 01/10/2022 रोजी मीरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तलायची निर्मिती करण्यात आली असून नव्याने स्थापन झालेल्या शांती गार्डन मीरारोड येथील पोलिस आयुक्त कार्यलय मध्ये ठाणे तसेच पालघर जिल्हातून प्रवास करुन आयुक्त कार्यलयामध्ये येणारे स्टाफ हे रेल्वे मार्गाने येऊ शकतात मात्र ठाणे माजिवडा कासरवडवली येथून येणाऱ्या स्टाफला शहर बस सेवा किंवा खाजगी वाहनाचा वापर करुन यावे लागत असून खाजगी वाहतूक सेवाचा लाभ घेताना जास्त वाहतूक भाडे दयावे लागते. उपरोक्त ठाणे माजिवडा व इतर भागातून येणाऱ्या स्टाफच्या प्रवासाची गरज लक्षात घेऊन ठाणे स्टेशन ते पोलिस आयुक्त कार्यालय अशी बस सेवा सुरु करण्यात यावी या बाबत मीरा भाईंदर महानगरपालिका प्रशासनाला विनंती करण्यात आली होती. त्या अनुषंगाने दिनांक 20/06/2022 रोजी पासून मीरा भाईंदर, वसई विरार पोलिस आयुक्त कार्यालय मध्ये येणाऱ्या स्टाफसाठी गयामुखी मार्गे ठाणे स्टेशन ते शांती गार्डन येथील पोलिस आयुक्त कार्यलय शहर बससेवा सुरु करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त कार्यालय व मीरा भाईंदर महानगरपालिका तील अधिकारी /कर्मचारी यांचे साठी बससेवा सुरु करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त कार्यालय व मीरा भाईंदर महापालिकातील अधिकारी व कर्मचारी यांचे साठी ही बस सेवा सुरु करण्यात आली आहे. सदरची बस सकाळी 08:45 वाजता ठाणे स्टेशन येथून पोलिस आयुक्त कार्यालय शांती गार्डन मीरारोड करिता उपलब्ध असणार आहे. दिनांक 20/06/2022 रोजी पहिल्या दिवशी पोलिस आयुक्त कार्यालयामध्ये आलेल्या स्टाफ तसेच बसचालक व वाहक यांचे मा. श्री. सदानंदजी दाते साहेब यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे.