पोलिस हा आपल्या समाज घटकातील अत्यंत महत्वाचा भाग आहे.कायदा सुव्यवस्था आणि शांतता समाजात प्रस्थापित हे पोलिस दलातील कर्मचारीचे काम होय.असा हा खाकी वर्दीतील पोलिस हा आकाशातून किंवा दुसऱ्या ग्रहावरून आलेला नसून,तर हा समाजातूनच आलेला तुमच्या आमच्या सारखा हाडामांसाचा असलेला समाजप्रिय माणूसच आहे. त्यालासुद्धा कुटुंब,नातेवाईक,मित्रपरिवार आहे. त्यालाही संवेदनशील आणि अस्वस्थ करणारे मन आहे. वरवर पाहता हा पोलिस दलातील खाकी गणवेशातील माणूस खत्रुड,रुक्ष, कडक, निर्बंदिक असा वाटत असला तरी,तो भावनाशील आहे, प्रज्ञावंत आहे.तर चाकोरीच्या बाहेर जाणारा मदतीचा हात देणारा सुध्दा आहे. आणि यातूनच त्याला शासनाची आणि पर्यायाने जनतेची सेवा बजावयाची आहे.
सर्वसाधारणपणे प्रत्येक जबाबदार संस्थेची ती शासकीय असो वा बिगर शासकीय संस्था
यांची संघटना असते . ते संघटनेच्या माध्यमातून संप,मोर्चे, असहकार यात सहभागी होऊ शकतात.आणि आपली मागणी गाऱ्हाणी शासनाकडे मागून आपले अधिकार आणि हक्क मिळवू शकतात.मात्र पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांना अशा प्रकारे संगठन करून मागण्या पूर्ण करू शकत नाही.त्यांच्या ह्या सर्व कृतींवर शासनाने बंधने आणि मर्यादा घातलेली आहे.
कोणताही कुठलाही प्रसंग असो पोलिसाना नेहमीच आपले कर्तव्य दिवसाचे चोवीस तास आणि वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस करावयाचे असते.रात्रंदिवस तो समाजाच्या कायदा आणि सुव्यवस्थेसाठी झटत असतो आणि म्हणून वाईट कृत्य करणाऱ्या दुर्जनांचा कर्दनकाळ आणि सज्जनांचा रक्षण करणारा हा पोलिस सदरक्षणाय खलनिग्रणाय हे ब्रीद वाक्य सार्थकी ठरवत आहे.गणेशोत्सवाचा सण असो,अथवा दिवाळी दसरा,किंवा बकरी ईद, मुबारक, मोहरम, नाताळचा सण किंवा इतर राजकीय कार्यक्रम ह्या सर्वांसाठी पोलिसांचे सहकार्य अतुलनिय आहे.आपल्या कुटुंबीयांपासून आणि आपल्या बायकोमुलापासून दूर राहूनही समाजात दुही आणि तेढ न निर्माण होण्याकरिता आणि दंगल सदृश्य परिस्थिती नियत्रणात ठेवण्याकरिता तहान भूक विसरून पोलिस आपले कर्तव्य बजावित असतो.अशा ह्या पोलिस कर्मचाऱ्याला आपल्यालाही समाजाकडून आपुलकी,प्रेम,सहकार्य मिळावे अशी अपेक्षा असते.आणि ह्या करीता पोलिस बॉईज असोसिएशन ह्या संस्थेच्या माध्यमातून खारीचा वाटा उचलून सहकार्य करीत आहेत.त्यासाठी असोसिएशनचे कार्यकर्ते,पदाधिकारी,महिला आघाडी कार्यकर्ते अशा रात्रंदिवस समाजासाठी कर्तव्यावर असलेल्या पोलिसाना चहा, बिस्किटे,नाश्ता,दुपारचे व रात्रीचे जेवण पुरविणे,पाण्याची व्यवस्था,आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करणे हे उपक्रम सणासुदीच्या दिवसात किंवा प्रासंगिक काळात राबविले आहेत.
तसेच, ह्या कोरोना कालखंडात पुरुष कर्मचारी यांच्या प्रमाणे महिला पोलिस कर्मचारी यांना देखील महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्या खाण्यापिण्याची आणि आरोग्याची काळजीपूर्वक विचारणा करून त्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. पोलिस बॉईज असोसिएशनच्या माध्यमातून पोलिस कर्मचाऱ्याच्या हिताच्या दृष्टीने आणि समाजोपयोगाच्या हेतूने ह्या कार्यात नेहमीच सहकार्याची भावना असते.आणि ह्या संघटनेचे योग्य नियोजन करण्याचे मुख्य काम पालघर जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष श्री प्रताप दूपारे अविरतपणे करीत आहेत.
पोलिस बॉईज असोसिएशनच्या वतीने श्री प्रताप दुपारे यांनी दुर्बल आणि मागास घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, अन्नदान,आरोग्य शिबीर,रक्तदान शिबिर,अभ्यास केंद्राचे आयोजन ते सातत्याने करीत असतात.अनाथ आणि दुर्बल घटकातील लोकांना दोन्ही वेळेचे जेवण ते आजतागायत इतर सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून खारीचा वाटा उचलून पुरवीत आहे तसेच ह्या उपक्रमात वैयक्तिक खर्चाने सुध्दा ते पुढाकार घेत आहेत.
तसेच,असोसिएशनचे सभासद,कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा वाढदिवस असो किंवा अन्य उपक्रमात ते स्वतः कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन अभिष्टचिंतन करून त्यांना शुभेच्छा देतात आणि सभासदांचे मनोबल वाढविण्याचा आणि सर्वाँना सोबत घेण्याचा प्रयत्न ते करीत असतात.आपण देशाचे,समाजाचे काहीतरी देणे लागतो ह्या उदात्त भावनेने सामाजिक कार्याचा वसा ते सातत्याने जपत आहेत.
ह्या सर्व उपक्रमास पोलिस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री प्रमोद तानाजी वाघमारे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे.तसेच त्यांचा सहभाग आणि सल्ला नेहमीच मिळत असतो. आपणही पोलिस बॉईज असोसिएशनच्या माध्यमातून राष्ट्रसेवा आणि जनसेवा घडवू शकता अधिक माहितीसाठी 7498237770/7308907578 ह्या ठिकाणी संपर्क साधावा.

       

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *