
प्रतिनिधी : मिरा भाईंदर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या वसई पोलीस स्टेशन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनैतिक धंदे चालत असून अर्थातच या अनैतिक धंद्यांना पोलिसांचे संरक्षण लाभलेले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, पालघर जिल्हा अंतर्गत येणाऱ्या वसई पोलीस स्टेशन हद्दीत प्रचंड प्रमाणात अनैतिक धंदे चालतात. पोलिसांच्या संरक्षणाशिवाय सदरचे अनैतिक धंदे चालूच शकत नाहीत. वसई पोलिसांच्या वसुली संदर्भात मध्यंतरी एक ऑडिओ क्लिप वायरल झाल्यानंतर पोलीस निरीक्षकांकरिता वसुली करणाऱ्या प्रवीण अशोक सोनार याची बदली करण्यात आली. मात्र सदर प्रकरणात ठोस कोणतीही कारवाई झाली नाही. बदली ही कारवाई होऊच शकत नाही. बदली झाल्यानंतर ही प्रवीण सोनार हा वसई पोलीस स्टेशनकरिता वसुली करीत असल्याचे वृत्त आहे.
वसई पोलीस स्टेशन हद्दीत अनेक अनैतिक धंदे चालतात. त्यातील काही धंदे व त्या धंदेवाल्यांकडून पोलीस जी वसुली करतात त्याची आकडेवारी पुढील प्रमाणे: भुईगाव पोलीस चौकीमध्ये विना परवाना रेती व्यावसायिकांकडून ४० हजार हप्ता, नायगाव उड्डाण पुलाजवळून अवैध रेती उपसा करणाऱ्यांकडून ७० हजार हप्ता, अवैध दारूचा धंदा चालविणाऱ्या प्रकाश दांडेकर याच्याकडून महिना २० हजार हप्ता, सतीश सातघरे महिना २५ हजार हप्ता, कोळीवाड्याचा जाकीर, आरिफ, पापडीचा समीर पै, मधु राठोड यांच्या सह तमाम अनैतिक धंदे करणाऱ्यांकडून पोलीस दर महा हप्ता घेतात. प्रवीण सोनार याची बदली मुख्यालयात झालेली असताना प्रवीण सोनार हाच आज ही या ठिकाणी पोलीस निरीक्षकांकरिता वसुली करीत आहे. वसई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कल्याणराव करपे यांच्याकरिता प्रवीण सोनार हा हप्ता वसुली करतो यात वाद नाही. हप्त्याची ही रक्कम मंत्रालयापर्यंत जाते. १०० कोटीच्या वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख अडकले. ते आज तुरूंगाची हवा खात आहेत. मात्र त्या नंतर ही अनैतिक धंदे व त्या धंदेवाल्यांकडून वसुलीचे उद्योग बेधडकपणे चालूच आहेत. अनिल देशमुख प्रकरणानंतर तरी पोलिसांनी बोध घेऊन वसुलीचे काम बंद करायला हवे होते. परंतु वसुली हे पोलिसांच्या रक्तातच भिनलेले आहे.
मटक्याचा धंदा चालविणारा सतीश सातघरे म्हणतो की, तुम्ही कितीही बातम्या व तक्रारी दिल्या तरी आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही पोलिसांना हप्ते देतो. त्यामुळे आमचा धंदा चालणारच. तुम्ही पत्रकार आमचं काही वाकडं करू शकणार नाही.या अवैध धंदेवाल्यांनी व त्यांना संरक्षण देणाऱ्या पोलिसांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. सदर प्रकरणी कारवाई केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.
कल्याणराव कर्पे यांच्या विरुद्ध नागरिकांच्या असंख्य तक्रारी आहेत. काही लोकांनी त्यांच्या विरुद्ध आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. विकासकांकडून लाच खाऊन चक्क खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम कल्याणराव कर्पे करतात. कल्याणराव कर्पे यांच्या भ्रष्ट व मनमानी कारभारामुळे जनता त्रस्त आहे.