पास्थळ कमलु वाडी याभागात राहणारे 46 मजूर कामगार व लहान मुले शुक्रवारी सकाळी 12 वाजताच्या सुमारास भर उन्हात चालत आपल्या गावी मध्यप्रदेश मधील छतरपुर जिल्ह्यात जाण्ययसाठी निघाले होते. याबाबत पत्रकारांना माहिती मिळताच त्यांनी बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदिप कसबे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर प्रदिप कसबे यांनी लागलीच तहसीलदार सुनिल शिंदे यांना याबाबत कल्पना दिली. पत्रकार जगदीश करोतीया व पालघर दर्पणचे संपादक हेमेंद्र पाटील यांनी तहसीलदार यांना सर्व कामगारांची माहिती आधार कार्ड नंबर सह देवुन तातडीने 46 कामगारांना महाराष्ट्राच्या शिरपुर सिमे पर्यंत सोडण्यासाठी परवानगी मिळवली. पालघर तहसीलदार सुनील शिंदे यांनी तात्काळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बसचे नियोजन केले. रात्री उशिरा आगार व्यवस्थापक संदीप शिंदे यांनी पालघर हुन परवानगी पत्र आणुन 9:30 वाजता सर्व मजूर कामगारांना मध्यप्रदेश सिमेवर पर्यंत बस सोडण्यात आल्या यावेळी मजूर कामगारांनी खुप आनंद व्यक्त केला. बोईसर पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी पत्रकारांचे आभार मानत त्यांनी दिवसभर केलेल्या मेहनतीचे कौतुक केले. जेष्ठ पत्रकार रामप्रकाश निराला यांनी मजूर कामगारांना मार्गदर्शन करत स्वच्छता राखणे, कोरोना ला घाबरून न जाता त्याबाबत योग्य खबरदारी घेणे याविषयी मार्गदर्शन देखील केले. यावेळी बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदिप कसबे, आगार व्यवस्थापक संदीप शिंदे, पालघर दर्पणचे संपादक हेमेंद्र पाटील, जेष्ठ पत्रकार जगदीश करोतीया, जेष्ठ पत्रकार रामप्रकाश निराला, पत्रकार उमाकांत भारती, बोईसर आगारातील कर्मचारी व चालक आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *