

आज दिनांक 26 जानेवारी 2021 प्रजासत्ताक दिनी पोलिस उप आयुक्त परिमंडळ 2 येथे सकाळी 11 ते 5 पर्यंत 2016 पासून प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांचा तपास योग्यरित्या न करीत असल्यामुळे तसेच बहुचर्चित दफनभूमि घोट्याल्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.2016 रोजी वसई रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 जवळ गटार कोसळून त्यात अनेक लोक जखमी झालेले होते.त्याचा गुन्हा adv अशोक वर्मा ह्यांनी मानिकपुर पोलिस ठाण्यात दाखल केला होता.आज 4 वर्ष लोटुन गेली तरीसुद्धा पोलिसांनी कुठलीच कारवाई केलि नाही उलट केस बंद करण्याची प्रक्रिया सुरु केलि.ह्याचबरोबर आदित्य डोंगरे मारहाण प्रकरणी तुलिंज पोलिस ठाण्याच्या PSI शिवदे ह्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यालासुद्धा 4 वर्ष उलटून गेली पोलिसांनी अजुन पर्यंत आरोप पत्र दाखल केले नाही.2019 मधे 6 महीने महापालिकेच्या दफनभूमि घोटाळ्यावर आंदोलन करुन सुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही.ह्या सर्व मुद्यांवर लवकरात लवकर कारवाई करावी तसेच आरोपींना अटक करावी ह्याच्या मागणीसाठी एक दिवसाचे सांकेतिक आंदोलन करण्यात आले.लवकरात लवकर जर कारवाई न करण्यात आली तर येणाऱ्या काही दिवसात बेमुदत आंदोलन केले जाईल असे adv अशोक वर्मा व सहकाऱ्यांनी सांगितले.ह्या आंदोलनात मिलिंद खानोलकर,किसनदेव गुप्ता,संजय गुप्ता,सुमित डोंगरे,अनिल चव्हाण,रवि भूषण,परदेशी करमाकर,देवेश कुमार,पावर ऑफ़ यूथ चे राहुल सींग,संदीप चौरसिया व अनेकांनी पाठिंबा दिला