
वसई (प्रज्योत मोरे)- मराठी भाषा दिवस व 1947 ला डॉ. बाबासाहेब आबेडकर यांची मुलभूत अधिकार व अल्पसंख्या विकास समितीवर नियुक्ती करण्यात आली होती या दोन मंगल दिनाचे औचित्य साधुन प्रजा सुराज्य पक्षाच्या वतीने भव्य बेरोजगार व सव्यरोजगार नोंदणी अभियान राबविण्यात आले. सदर कार्यक्रमाचे उद्घघाटन मा.दीपक कलिंगण राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया फिल्म प्रोड्युसर टेकनीशियन अँड आर्टिस्ट युनियन तसेच ॲड मा. नवदित गुजर हाय कोर्ट मुबई यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाघाटन प्रसंगी दिपक कलिंगन यांनी अण्णासाहेब यांना शब्द दीला की रेल्वे आणि फिल्म इंडस्ट्रीत रोजगार मिळऊन देण्याची हमी घेतली आहे.तर ॲड गुजर साहेबांनी कायदेशीर प्रक्रियेच्या समस्या सोडऊन न्याय देण्याची माझी जवाबदरी असल्याचे त्यांनी सांगितले पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब तिगोटे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की कोनत्या पक्षाने काय केले या भानगडीत मला पडायचे नाही मला प्रजा सुराज्य पक्षाच्या वतीने पक्षाच्या संपर्कात आलेल्या प्रत्यक नागरीकाचे प्रश्न सोडविने आणि त्यांचे मूलभूत अधिकार आबादित ठेवण्यासाठी जे काही करणे शक्य होईल ते करण्याची माझी तयारी आहे. म्हणुन सागतो आहे.तुम्ही हाक द्या! आम्ही साथ देऊ !! असे उदगार त्यांनी काढले सदर प्रसंगी मा.प्रदीप गंगावणे यांनी प्रमुख मार्गदर्शन करताना ते बोलले की मागण्या पेक्षा देण्यासाठी स्वतला तयार करा म्हणजे उद्योग श्रेत्रात जाऊन स्वताला सिद्ध करा जेणेकरुन तुम्हाला नोकऱ्या निर्माण करता येईल असे केल्यास तुम्हा तुमच्या लोकान नोकरी देता येईल
सदरील कार्यक्रमास मा.अब्दुल लतिफ शेख राष्ट्रीय उपाध्यक्ष, मा.शिवदास मोरे राष्ट्रीय सचिव,मा.संजय पवार अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश,मा. मदिना फिरदौस उपाध्यक्षा महाराष्ट्र प्रदेश प्रजा सुराज्य पक्ष मा.मंदा वाघ युवती अध्यक्षा प्रजा सुराज्य पक्ष तसेच गोविंद पिंपळगावकर राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय जिवा सेना, मा. संजय गायकवाड संस्थापक अध्यक्ष. प्रेंथर रिपब्लिकन सेना मा.विनायक खर्डे संस्थापक अध्यक्ष.स्वराज रक्षक संघ, मा. जितेंद्र घोडगावकर शिरसाट कार्याध्यक्ष राष्ट्रीय बहुजन विकास संघटना, मा. संजु तडवी उपाध्यक्ष प्रजा सुराज्य जनरल कामगार संघटना, मा. अनिल वाघेला कोकण प्रांत अध्यक्ष, मा. किशोर मोरे कोकण प्रांत उपाध्यक्ष मा. प्रिया मुंडे वसई तालुका अध्यक्षा, मा. सलमा सय्यद वसई तालुका महीला जनसंपर्क इत्यादी मान्यवर व पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते मा.असिफ खान युवा अध्यक्ष वसई विरार शहर जिल्हा मा. मिना ताडेल महीला उपाध्यक्षा वसई विरार शहर जिल्हा, मा. मिना तडवी महीला सचिव वसई विरार शहर जिल्हा प्रजा सुराज्य पक्ष यांनी सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते मा.असिफ खान युवा अध्यक्ष वसई विरार शहर जिल्हा यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख मार्गदर्शन, प्रमुख पाहुणे आणि पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार मानले
