आज ०८ मार्च २०२१ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रजा सुराज्य पक्षाच्या महिला विभागाने वसई तहसिल कार्यालयासमोरील सिध्दार्थ नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

सदर प्रसंगी वसईच्या तहसिलदार मॅडम मा. उज्वला भगत ह्यांना प्रजा सुराज्य पक्षाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच सामाजिक कार्यकर्ता मा. कल्पना खरपडे व युवा पत्रकार सुरेखा बाणे, मा. अॅड. विजिता पाल ह्यांना सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

पक्षाच्या पालघर जिल्हा महिला अध्यक्षा मा. प्रिया मुंडे ह्यांनी उपस्थित महिला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये महिलांना दिलेल्या अधिकारामुळेच आज सर्वच क्षेत्रात महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात. तसेच महिलांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्या सदैव तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रजा सुराज्य पक्षाच्या कोकण प्रांत अध्यक्षा मा. जयश्री पचलोड (बडगुजर) ह्यांचे अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला. सदर प्रसंगी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. अण्णासाहेब तिगोटे , उपाध्यक्ष मा. लतीफ भाई शेख, उपाध्यक्ष मा. बच्चुभाई कनोजिया ह्यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

तसेच दिपक वणे, हेमलता बिजवे, सुनिता वणे, प्रिती तिवारी, प्राजक्ता घाडशी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *