
नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप शर्मा यांच्यासाठी नालासोपारा यॆथीलच रॅपर मुलांनी अफलातून रॅप साँग गायले आहे. हीच मुले गली बॉईज चित्रपटातही चमकली होती. शेर आया, शेर आया.. हर मसलोंका हल लाया.. अशा शब्दरचनेबरोबरच विरार, नालासोपाऱ्यातील स्थानिक समस्यांचे वर्णन, दृश्ये यांची अप्रतिम गुंफण या व्हीडिओत करण्यात आल असून, मतदारसंघात हे गाणे सुपरहीट झाले आहे.
येथील पूरस्थिती, कचरा, अनधिकृत बांधकामे, वाहतुकीचा बट्ट्याबोळ या व अशाच समस्यांचे प्रभावी चित्रण या व्हीडीओत गाण्याबरोबरच आहे. प्रदीप शर्मा यावर त्यांचा एक्शन प्लॅन घेऊन सर्व समस्यांवर मात करतील, बदल घडवण्यासाठीच उत्तर म्हणून ते आले आहेत, असा संदेश या रॅप गाण्यातून देण्यात आला आहे.
मध्यंतरी ‘गली बॉयज’ हा चित्रपट आला होता. नालासोपारा येथील ‘रॅपर मुलांवर’ हा चित्रपट बेतला होता, असे म्हटले जाते. यातील काही मुलांनी या चित्रपटात कामही केले होते. आता याच मुलांतील ‘टॅलेंट’चा पूरेपुर वापर करून प्रदीप शर्मा यांच्या प्रचारासाठी ‘रॅप सॉन्ग’ बनवले गेले आहे. आणि हे गाणे खरेच अप्रतिम आणि नालासोपारातील स्थितीला साजेसे झाले आहे.