
बेसिन कैथोलिक बैंकेने “प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि सुरक्षा विमा योजना ” या दोन्ही योजनांकडे दुर्लक्ष केले आहे. या योजनेंतुन जर कोणी खातेदार मयत झाला तर त्याच्या वारसाला दोन लाख रुपये मिळतात. परंतु, खातेदाराच्या खात्यातुन वार्षिक 330/- रु कापने गरजेचे होते. मात्र आपल्या गावातील मयत झालेल्या लोकांचे बैंकेने 330 /- रु कापले नसल्याने मयत खातेदाराच्या वारसांना दोन लाख रुपये मिळणार नाहीत. या योजनेचा मयताच्या वारसांना दोन लाख रूपयांचा लाभ मिळावा म्हणून प्रत्येक खातेदाराच्या खात्यातून 330/- रु कापने हे बँकेचे काम होते. मात्र बँकेने यावर दुर्लक्ष केल्यामुळे आणि खात्यातून पैसे न कापल्यामुळे आज ज्यांचे नवरे वारले आहेत अशा आपल्या विधवा महिलांना दोन लाखाची मदत मिळू शकत नाही. याला बँक ही पूर्णपणे जबाबदार आहे. आपल्या ” वसई युवा बल ” या योजनेचा लाभ आपल्या मयत खातेदारांच्या वारसांना मिळावा म्हणून गेल्या आठ महिन्यांपासुन पत्रव्यवहार करुन पाठपुरावा करीत आहे. मात्र बँक याकडे दुर्लक्ष करीत आहे. म्हणून शुक्रवार दि. 18 जून रोजी आपली वसई युवा बल संघटना बैंकेच्या पापडी येथील मुख्य कार्यालयावर ( हेड ऑफिस) सकाळी 10. 30 वाजता ठिय्या आंदोलन करणार आहे. मित्रांनो, याचा फायदा बायको मेली तर नवऱ्याला आणि नवरा मेला तर, बायकोला आणि आणि दोघेही गेले तर, दोघांचे दोन आणि दोन चार लाख मुलांना असा सर्वांना फायदा मिळणार आहे. म्हणून बैंकेला वटनीवर आणण्यासाठी शुक्रवारी 18 जुनला सकाळी 10. 30 वाजता या आंदोलनात सहभागी व्हा ! असे आव्हान वसई युवा बल यांनी केले आहे
