

प्रतिनिधी
वसई : वसई-विरार शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि सोशल डिस्टनसिंगचे तीनतेरा वाजलेले असताना आता वसई-विरार महापालिकेकडून दुकानदारांसोबत दुजाभाव होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. वसई-होळी येथील काही मर्जीतल्या चिकन शॉपना वसई-विरार महापालिकेच्या प्रभाग आयचे प्रभारी सहाय्यक आयुक्त सुभाष जाधव दुकाने सुरू ठेवण्याची मुभा देत असल्याने अन्य चिकन शॉप मालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कोरोनाचा वाढता प्रभाव रोखला जावा आणि सोशल डिस्टनसिंगची अंमलबजावणी व्हावी; यासाठी जिल्हाधिकारी आणि पालिकेने दुकानदारांना नियमावली घालून दिली आहे. मात्र वसई-होळी येथे प्रभाग आयचे प्रभारी सहाय्यक आयुक्त सुभाष जाधव यांनी ही नियमावली आपल्या मर्जीतील चिकन शॉपना शिथिल करून दिली असल्याचा आरोप अन्य चिकन शॉप मालकांनी केला आहे.
आपल्याला दुकाने बंद ठेवण्यास सांगणारे सुभाष जाधव अन्य दुकाने सुरू ठेवण्यास कशी आणि कोणत्या आधारे मुभा देतात, असा प्रश्न या दुकानदारांनी केला आहे.