वसई विरार शहर महानगरपालिकातील प्रभाग समिती जी ( वालीव ) हद्दीत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा तारकेनगर , जिल्हा परिषद शाळा सातीवली , जिल्हा परिषद शाळा तुंगार फाटा,जिल्हा परिषद शाळा चींचोटी येथे फिवर क्लिनिक सुरू करण्याची मागणी अपंग जनशक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा दिव्यांग समिती सदस्य देविदास जयवंत केंगार यांनी वसई विरार शहर महानगरपालिका चे आयुक्त , प्रभाग समिती जी चे सहाय्यक आयुक्त तसेच आरोग्य अधिकारी यांना आपले सरकार ह्या पोर्टल वरून ऑनलाईन मागणी केली आहे.

देशात कोरोना बधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे .तसेच आपल्या शहरात देखील कोरोना चा प्रादुर्भाव वाढत आहे.व्यक्ती कोरोना बाधित झाल्यावर जी लक्षणे दिसून येतात , जसे की ताप , खोकला , सर्दी अशा लक्षणाचे निदान करून त्यावर उपचार करणे आवश्यक आहे . फिवर क्लिनिकच्या माध्यमातून कोविड १९ चा रुग्ण आढळून आल्यास त्यावर योग्य उपचार करणे शक्य होणार आहे .त्यामुळे ईतर सामान्य नागरिकांमार्फत पसरणारा कोरोना विषाणूचा संसर्ग आपण रोखू शकतो .जर या भागात फीवर क्लिनिक सुरू केले तर त्याचा फायदा वालीव फाटा तारकेनगर , सातीवली , आंबेडकर नगर , समता नगर , तुंगार फाटा , धन्य सातीवली नगरी , कुवरा पाडा , पळाट पाडा , दामू पाडा चिंचोटी या विभागातील नागरिकांना फायदा होईल.
वालीव फाटा तारकेनागर , सातीवली , तुंगार फाटा , चींचोटि ह्या परिसरातील जिल्हा परिषद शाळेत फिवर क्लिनिक सुरू करावे. अशी मागणी अपंग जनशक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देविदास जयवंत केंगार यांनी वसई विरार शहर महानगरपालिका चे आयुक्त , प्रभाग समिती जी चे सहाय्यक आयुक्त तसेच आरोग्य अधिकारी यांना आपले सरकार ह्या पोर्टल वरून ऑनलाईन मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *