
प्रतिनिधी :
वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीत सागरशेत पेट्रोल पंप नजीकच्या अनधिकृत बांधकामांना महानगरपालिका अधिकाऱ्यांनी लाच खाऊन संरक्षण दिल्याचे स्पष्ट झाले असून अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई व्हावी. सदरची अनधिकृत बांधकामे निष्कासित करून बांधकामे करणाऱ्यांवर एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा., अशी मागणी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्य विभागाचे वसई विरार उपाध्यक्ष तसनिफ़ शेख यांनी केली आहे. पेट्रोल पंपला लागून ही अनधिकृत बांधकामे असून सदरची बांधकामे अनधिकृत असल्यामुळे बांधकाम धारकाकडे अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला असण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे ही बांधकामे अत्यंत धोकादायक असून ही बांधकामे त्वरित निष्कासित करावीत.
वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीत सागरशेत पेट्रोल पंप नजीकच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याकरिता भारतीय जनता पार्टीतर्फे सातत्याने तक्रारी करण्यात आल्या. मात्र महानगरपालिकेने सदरच्या अनधिकृत बांधकामांना संरक्षण दिले आहे. पेट्रोल पंप नजीक असलेल्या सदरच्या अनधिकृत बांधकामांना अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला नसून ही अनधिकृत बांधकामे धोकादायक आहेत. याची दखल घेऊन महानगरपालिकेने त्वरित निष्कासनाची कारवाई करावी, अशी मागणी तसनिफ़ शेख यांनी महानगरपालिका मुख्यालय व प्रभाग समिती आय कार्यालयाला दिलेल्या निवेदनात केली आहे.