
रिचर्डमधील भूमाफिया शमसेर आणि रफिक खान यांचे अनधिकृत बांधकाम कोणाच्या संरक्षणात आहे?
भूमाफिया शमशेर आणि रफिक यांच्या बेकायदा बांधकामांवर सहाय्यक आयुक्त रुपाली संखे आणि अतिक्रमण अभियंता हितेश जाधव कारवाई कधी करतात, हे पाहावे लागेल.
वसई(प्रतिनिधी )-वसई विरार शहर महानगरपालिके मध्ये श्रीमंतांसाठी वेगळा कायदा आणि गरिबांसाठी वेगळा कायदा असा भास होत आहे , कुणी गरीब बांधला की तो पाडून मनपा खूप चर्चेत असते , पण त्यावर धनदांडग्यांच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे महापालिका प्रशासन दुटप्पीपणाचा अवलंब करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. आजकाल वसई विरार पालिकेतील काही भ्रष्ट अधिकारी भूमाफियांवर मेहरबानी करत आहेत. पालिकेचे रक्षकच भक्षक झाल्यावर यापेक्षा वाईट परिस्थिती काय असू शकते. मनपातील काही भ्रष्ट अधिकारी फक्त खिसे भरण्यासाठी आपला प्रामाणिकपणा विकत आहेत.(vvmc) महापालिकेत भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे. असेच एक प्रकरण रिचर्ड येथे प्रभाग एफ कार्यक्षेत्रांतर्गत पहावयास मिळत असून तेथे बेकायदेशीर विकासक भूमाफिया शमशेर व रफिक हे बेकायदेशीर बांधकामे बिनधास्त करत आहेत, बेकायदा बांधकाम पूर्ण होणे हा भ्रष्टाचार नाही तर काय? भुमाफीया यांना शासन व प्रशासनाची भीती नाही आहे तसेच आपल्या गुंड प्रवृत्ती मुळे हे भूमाफिया तक्रारकर्त्यांना धमकावून गप्प बसवतात.

