

विरार : वसई-विरार महापालिका मुख्यालयात प्रभारी सहाय्यक आयुक्त (आरोग्य) ही जबाबदारी भूषवणाऱ्या वसंत मुकणे यांची बदली अखेर प्रभाग ‘ब’मध्ये करण्यात आली असून; त्यांच्या जागी प्रभाग ‘ब’मधील वरिष्ठ आरोग्य निरीक्षक निलेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तर वसंत मुकणे हे प्रभाग ‘ब’मध्ये वरिष्ठ आरोग्य निरीक्षक म्हणून काम करणार आहेत. नवनियुक्त आयुक्त डी. गंगाथरन यांनी कामकाजाच्या सोयीने या बदली केल्या असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली असली तरी; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसंत मुकणे कामकाज सांभाळण्यात अपयशी ठरल्याने त्यांची उचलबांगडी करून; त्यांच्या जागी पुन्हा एकदा अननुभवी निलेश जाधव यांची नियुक्ती केल्याचे म्हटले जात आहे.