
वसई-पेल्हार विभागातील एफ, धानीव तलावाजवळ, माजी नगर सेवक पंकज पाटील यांच्या कार्यालयासमोर काही दिवसांपूर्वी झालेल्या दुर्घटनामुळे
संपूर्ण भिंत कोसळली होती. त्यामध्ये मोठी दुर्घटना टळली मात्र आज पुन्हा तेच बेकायदा बांधकाम जोरात सुरू आहे.
मात्र प्रभारी सहाय्यक आयुक्त पाटील हे कोणत्या अपघाताची वाट पाहत आहेत.उद्ध्वस्त होण्याऐवजी आर्थिक भुर्दंड घेऊन उभारल्या जाणाऱ्या बेकायदा बांधकामांना आश्रय देत आहेत. वसई विरार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील,सहाय्यक आयुक्त शशिकांत पाटील यांना कारवाईचे आदेश कधी देणार?
सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा आहे कि प्रभाग समिती एफ चे कंत्राटी अभियंता किशोर पवार हे बेकायदा बांधकामाच झालेल्या ठिकाणी जाऊन त्यांना 200 रुपयांची लाच द्यावी लागेल, अन्यथा तोडफोडीची कारवाई करण्यात येईल, असे सांगून ते पुन्हा कार्यालयात जातात , असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
