
वैतरणा रेल्वे स्थानकात प्रवाशांना प्लॅटफॉर्म पर्यंत पोहोचण्यासाठी असलेला एकमेव मार्ग म्हणजे सबवे .
परंतु त्याच सबवेमध्ये मागील ३ दिवसंपासून मोठ्याप्रमाणात पाणी साचले होते .
वैतरणा स्टेशन अधीक्षक
श्री मदन शर्मा यांना वारंवार विचारणा केल्यानंतर त्यांनी लाईट नसल्या ने पाणी काढू शकत नसल्याचे एकच कारण देऊन आपली जबाबदारी झटकली . रेल्वे प्रशासनाकडे सलग ३ दिवसा नंतर ही प्रवाशांच्या सोयीचा कुठलाही विचार त्यांनी न केल्यामुळे .
डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था वैतरणा स्टेशन कमिटीच्या माध्यमातून पेट्रोल वर चालणारे पंप आणून स्वखर्चाने आणले व ह्या सबवे मध्ये मोठ्या प्रमाणात साचलेले पाणी काढण्याचे काम आज ५/८/२०१९ रोजी हाती घेण्यात आले.
सलग ३ तास पंप चालवल्यानंतर सबवेमध्ये असलेले सर्व पाणी बाहेर काढण्यात यश आले आणि प्रवाशांसाठी मार्ग मोकळा केला .
ह्या कामासाठी श्री रमाकांत चौधरी , किरण पाटील यांनी पाणी काढण्यासाठी पंप उपलब्ध करुन दिले तर संस्थेचे सदस्य सत्यवान सापने, पंकज पाटील, मुकेश जैन ,नंदन पाटील, प्रदीप पाटील, संदेश पाटील ,महेश पाटील ,अंकूश पाटील ह्या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले .
